आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील जय श्रीराम गणेश मंडळ व देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी गांधी चौकात सर्वधर्म समभाव महाआरती उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र व पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंध आभास सिंग, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजपचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी व हिंदु समाजाचे प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, रामचंद्र डोंगरे, राजू मानमोडे, पुंडलिक खनके, संजय भोंगळे, गजानन चिंचोलकर, प्रदीप कोरडे, मुस्लिम समाजाचे हनीफ शेख, रज्जाक शेख, हसन शेख, मकसूद शेख, मोमीन शेख, मकसूद अहमद, इस्माईल शेख, असगर खान, बौद्ध समाजाचे रामचंद्र चंदनखेडे, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, बबलू सातपुते, सचिन कोंडावार, दिलीप कांबळे, अरुण रामटेके, इसाई समाजाचे शामसुंदर नायडू, रमेश नातर, संदीप आरमुला, आनंद गुंडेटी, सागर तांड्रा, व सिख समाजाचे सरदार संमत सिंग, जतींदर दारी, गुरुमीत सिंग, गुरपाल सिंग, अशोक मदान प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले, घुग्घुस शहरातील महाआरती ही सर्वधर्मीय ऐकतेचे प्रतीक आहे. घुग्घुस हे औद्योगिक शहर असून सर्व जाती धर्माचे लोक गुन्यागोविंदाने राहतात याचा प्रत्यय सर्वधर्म समभाव महाआरतीच्या माध्यमातून येत आहे. शहरात विविध राज्याचे लोक राहतात व सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला घुग्घुस शहराने राज्यातील जनतेला आदर्श दिला. घुग्घुस शहराने अनेक वर्षांपासून तीच प्रथा परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...