वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
वरोरा/भद्रावती :-
शिवसेना पक्ष 80% समाजकारण व 20% राजकारण या ध्येय्यधोरणावर चालत असुन वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी याच धोरणाचा अवलंब करुन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये कामाचा झंझावात चालविला आहे. शिवेसेनेच्या वरोरा येथील कार्यालयात नेहमीच विधानसभा क्षेत्रातील नागरीक आपल्या समस्या घेवुन येत असुन त्या समस्या मार्गी लावण्याकरीता रविंद्र शिंदे नेहमीच तत्पर असतात. समाजातील गरजवंताला आपली मदत पोहचावी या हेतुने सामाजिक कार्य सुरू असुन समाजातील तळागाळातील लोकांची कामे या माध्यमातुन करण्याचा ध्यास विधानसभा प्रमुखाने घेतलेला आहे.
मजरा येथील बि.एस.पी.इस्पात कंपनीमध्ये वरोरा भद्रावती तालुक्यातील आसपासच्या खेड्यातील कामगार लकी कॉन्ट्रक्टर यांच्याकडे डिसेंबर 2020 पासुन नियमित कामावर होते. लकी कॉन्ट्रक्टर यांचा कंपनीशी असलेला कॉन्ट्रक्ट 2023 मध्ये संपुष्टात आल्यानंतर बि.एस.पी.इस्पात कंपनीने सदर कामगारांना कामावर ठेवुन घेतले व कंपनी त्यांचा पगार देईल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार दिल्यानंतर कामगार नेहमीप्रमाणे कामावर गेले असता त्यांना कामावर घेतल्या गेले नाही व त्यांना दोन महिन्यांचा पगार सुध्दा देण्याचे कंपनीने नाकारले. नियमाप्रमाणे त्यांना कामावरुन काढण्या अगोदर सुचना द्यायला पाहिजे होती व त्यांचा पगार पुर्ण द्यायला पाहिजे होता परंतु अशा प्रकारचे कोणतीही कार्यवाही कपंनीकडुन करण्यात आली नाही व त्यांना सरसकट कामावरुन कमी करण्यात आले.
त्यामुळे त्यांनी सदर पगाराची रक्कम मिळण्याकरीता व कंपनीमध्ये कामावर परत घेण्याकरीता शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांशी यासंबंधाने चर्चा करुन त्यांचे पगार देण्याबाबत व त्यांना पुर्ववत कामावर घेण्याबाबत चर्चा केली व यासंबंधाने अधिकाऱ्यांशी बैठकिचे आयोजन केले. सदर बैठकिमध्ये कामावरुन काढुन टाकण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्याचे कंपनीने मान्य केले व पोळा सणाच्या अगोदर कामगारांना त्यांचे थकित पगार कंपनीने त्यांच्या खात्यामध्ये जमा केले.
त्यामध्ये पकंज वामनराव मुडे, गणेश सुरेश भोगेकर, नितेश विला बुरांडे, दिनेश सुधाकर कोमरेड्डीवार, अर्जुन नथ्थुजी आत्राम, विभीशन उधो सोनाजी, भालचंद्र गजानन बोढे, यश जसवंत देव, विनोद पांडुरंग मोहुर्ले, विजु कोडु सोनानी, सुरज चंद्रभान जीवतोडे, राकेश नानाजी खोके, गणेश ईश्वर बोढाले, सुनिल फुलकर, अविनाश रामटेके, सतिश तिखट, अनिल राजुरकर, प्रतिक जिवतोडे, अमोल आंबूरकर, वैभव मोकाशी, विक्की कुंभारे, प्रतिक मुन, रवि रामटेके, कुनाल ताडुरवार, यांची पगार थकित राहिलेले होते.
वरील कामगारांचे वेतन मिळालेले असुन ज्यांचे वेतन बाकी राहीलेले आहेत त्यांना लवकरात लवकर थकित वेतन मिळणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगीतलेले आहे. कंपनीचे थकित वेतन मिळालेल्या कामगारांनी शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आभार मानले. याबाबत रविंद्र शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, भविष्यातही असेच समाजपयोगी कार्ये करत राहणार असुन समाजातील वंचित, शोषीत तसेच कोणत्याही व्यक्तीला अडचण आल्यास त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कार्यालयाशी किंवा व्यक्तीश: संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...