Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *नुकसानग्रस्त सोयाबीन...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रूपये मदत करा* *महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार सुभाष धोटे यांची निवेदनाद्वारे मागणी*

*नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रूपये मदत करा*    *महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार सुभाष धोटे यांची निवेदनाद्वारे मागणी*

*नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रूपये मदत करा*

 

महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार सुभाष धोटे यांची निवेदनाद्वारे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :- राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अचानकपणे सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आल्यामुळे तीनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीके पिवळे पडून मोठया प्रमाणावर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. अचानक सोयाबिन पिकावर आलेल्या रोग प्रादुर्भावाने परिसरातील शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. नुकतेच शासनाने मोबाईल अँप द्वारे ई-पिक पाहणी सादर करण्याचे सुचविले होते मात्र अनेक शेतकऱ्यांकडे Android  मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तसेच जिल्ह्यातील १०० % शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नाही अशा वेळी अनेक शेतकरी बांधव पिक विम्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सोयाबीन पिकांवर अचानकपणे आलेल्या रोग प्रदुर्भावाच्या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी सोयाबीन पिकांचे सर्व्हेक्षण करून शासनाने नैसर्गिक आपत्ती नुकसान या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एक लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...