आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :चंद्रपूर येथे निघालेला भव्य ओबीसी महामोर्चा हा ओबीसी समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला, पूर्व विदर्भात ओबीसींनी आपला आवाज बुलंद केला, राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेवून ओबीसी समाजाला चर्चेकरीता बोलवावे व ओबीसींच्या मागण्या मंजूर कराव्या, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी केले.
स्थानिक गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आज रविवार दि. १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व पक्षीय तथा ओबीसीतील सर्व जातनिहाय संघटनांनी मिळून महामोर्चा काढला. या महामोर्चात हजारोंच्या संख्येत ओबीसी समाज बांधव उपस्थित होता.
सर्वप्रथम स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवि टोंगे यांना भेट देवून महामोर्चास सुरुवात करण्यात आली.ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्व्हे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे हॉस्टेल सुरु करून स्वाधार योजना लागू करावी, या प्रमुख मागण्या घेऊन सर्व पक्षीय तथा ओबिसीतील सर्व जातनिहाय संघटना मिळून ओबीसींचा आवाज बुलंद केला.सदर आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांसोबत चर्चा करावी व ओबीसी समाजाला आश्वस्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
या महामोर्चात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक तथा ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आशीष देशमुख, आमदार परिनय फुके, देवराव भोंगळे, राहुल पावडे, रवि नागपुरे, विजय पिदुरकर, करण देवतळे, विवेक बोढे, रमेश राजूरकर, नामदेव डाहुले, आशीष देवतळे, राज्याचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, दिनेश चोखारे, गजानन गावंडे, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर, कुणाल चहारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सलील देशमुख, राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे रविंद्र शिंदे, संदीप गिऱ्हे, निलेश बेलखेडे, नंदू पढाल, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर, सामाजिक कार्यकर्ते एड. पुरुषोत्तम सातपुते, बळीराज धोटे, एड.विजय मोगरे, एड. दत्ता हजारे, एड. जयंत साळवे, नंदू खणके, राजेश बेले, डॉ. कांबळे, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रा. अनिल शिंदे, प्रा. विजय बदखल, डॉ. विजय देवतळे, संदीप गड्डमवार, डॉ. महाकुलकर, चंदूभाऊ वासाडे, प्रा. बबन राजूरकर, डॉ. सौरभ राजूरकर, रणजित डवरे, प्रा. अनिल डहाके, पारस पिंपळकर, गोमती पाचभाई, मनीषा बोबडे, गोवील मेहरकूरे, डॉ. पियूष मेश्राम, विनोद सातपुते, महेश खंगार, तुळसीराम बुरसे, गणपती मोरे आदी विविध पक्षाचे तथा जातनिहाय संघटनेचे पदाधिकारी, इतर मान्यवर, कार्यकर्ते व ओबीसी समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.
ओबीसी महामोर्चात सहभागी सर्व ओबीसी समाज, सर्व जातनिहाय संघटना व पदाधिकारी, सर्व पक्षीय मान्यवर, कार्यकर्ते यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे डॉ. अशोक जीवतोडे यांनी मनस्वी आभार मानले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...