आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- भारत हा एक कृषिप्रधान देश आहे.महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात,पोळा हा एक शेतकऱ्यांचा मोठा सण आहे. आज सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे तान्हापोळा महोत्सव २०२३ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.चांद्रयान,शेतकरी आत्महत्या,ग्रामीण भागातिल जीवनमान, महिलांवरील अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई या विषयावरील प्रतिकृतींनी महोसत्वाला लाभले अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले.
आज तान्हापोळा महोत्सव २०२३ गुजरी चौक, सावली येथे भरला होता. हजारोच्या संख्येत लोकांची उपस्थिती व २००-३०० बालगोपालांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.मनोरंजकात्म गोष्टी, सजावट,डीजे,संदल यामुळे वातावरण आनंदिमय झाले होते.स्पर्धेचा निकाल हा नंदीबैल सजावट व वेशभूषा या आढावर देण्यात आला याचे परीक्षण मा.विजय गायकवाड सर, मा.घनश्याम मेश्राम सर, सौ.रिंकी सुरमवार मॅडम,सौ.पायल राईंचवार मॅडम यांनी केले. त्यात प्रथम पुरस्कार मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधि पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ११००१ रुपये दीप्तांश दुधे, द्वितीय पुरस्कार ७००१ रुपये मा.संदीप पाटील गड्डमवार,अध्यक्ष भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दक्ष सुरमवार, तृतीय पुरस्कार ५००१ रुपये मा.रोहितभाऊ बोम्मावार,अध्यक्ष चंद्रपूर अर्बन मलटिस्टेट यांच्याकडून दिग्विजया सुरमवार तर चतुर्थ पुरस्कार ३००१ रुपये सौ.लताताई लाकडे, नगराध्यक्षा नगरपंचायत सावली यांच्याकडून श्रावणी सुरमवार यांना मिळाले.यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजि सभापती पं.स.मा.विजय कोरेवार, चंद्रपूर अर्बन बँक मलटिस्टेटचे अध्यक्ष मा.रोहितभाऊ बोम्मावार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,शहराध्यक्ष महिला आघाडी सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.प्रफुल वाळके,मा नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,मा.सचिन संगीडवार,तसेच नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार, सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम,सौ.सिमा संतोषवार, व मा.प्रशांत राईंचवार, मा.नितीन गड्डमवार,मा.पिंटू गड्डमवार,मा.अंकुश शेंडे,मा.आकाश खोब्रागडे,मा.निखिल दुधे,मा.कमलेश गेडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन मा.चंद्रकांत गेडाम यांनी केले तर आभार मा.गुणवंत सुरमवार यांनी केले.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...