आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : नुकताच जवान चित्रपट झळकला असून चित्रपटाने आरोग्य विभागातील अराजकता उघडकीस आणली मात्र बेशरम व निगरगट्ट प्रशासनाला याचा काहीच फरक पडत नाही.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून लॉयड्स मेटल्स या कंपनीने मोठा गाजावाजा करीत घुग्घुस नगरपरिषदेला 14 ऑगस्ट 2023 रोजी एक आधुनिक सोयीयुक्त रुग्णवाहिका व शववाहिका भेट स्वरूपात दिली
मात्र घुग्घुस नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराने नागरिकांच्या कामी रुग्णवाहिका तर आलीच नाही आणि शववाहिका त्या रुग्णाला कामी पडू नये अशीच नागरिकांची प्रार्थना आहे.
शहरातील आदिवासी समाजातील वयोवृद्ध महिला ताराबाई आत्राम या घरात पडल्याने गंभीररित्या घायाळ झाल्या त्यांना तातळीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते.
काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी रुग्णालया करिता नगरपरिषदेच्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी मुख्याधिकारीशी संपर्क साधण्यास सांगितले मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी रुग्णवाहिके करिता चार्जेस लागतील असे सांगितले असता अनवर यांनी चार्जेस भरण्याची तैयारी दर्शविली असता रुग्णवाहिकेवर चालक नसल्याचे सांगितले हा नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार शहरात शुरु आहे
ज्या लॉयड्स मेटल्स कंपनीने रुग्णवाहिका दिली ती कंपनी एक चालक देऊ शकत नाही का ?
कंपनीच रुग्णवाहिका देत असेल तर गरीब नागरिकांनी चार्जेस का द्यावे ही कंपनी डिजलचा खर्च उचलू शकत नाही का ?
एक महिन्याचा कालावधी होत असतांना नगरपरिषदेने चालक का ठेवले नाही ?
असे अनेक गंभीर प्रश्न याप्रसंगी उभे होत आहे.
त्या रुग्णाला शेवटी एका खाजगी वाहनात रुग्णालयात नेण्यात आले मात्र नगरपरिषदेची रुग्णवाहिका गोर - गरिबांच्या कामी पडली नाही.
शहरातील गोरगरीब नागरिक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना संपर्क करू शकत नसल्याने सदर रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाच्या स्वाधीन करावी अशी मागणी काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी केली आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...