आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती :-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लवकरच वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना पक्षांतर्गत ‘होऊ द्या चर्चा..!’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शिवसैनिक थेट जनतेशी संवाद साधणार आहे. या संवादातून माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
‘ होऊ द्या चर्चा..! ’ अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी वरोरा -भद्रावती विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिक बंधू -भागिनिंच्या महत्वपूर्ण बैठका आयोजित केलेल्या आहे. भद्रावती येथे श्री. मंगल कार्यालयात दि. १६ सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता तसेच वरोरा येथे पक्षाच्या ‘शिवालय’ मध्यवर्ती कार्यालयात यापूर्वी दि. १७ सप्टेंबर रोज रविवारला आयोजित केलेली बैठक याच दिवशी ओबीसी मोर्चा असल्याने रद्द केली आहे. सदर बैठक दि. १८ सप्टेंबर रोज सोमवारला वरोरा येथे पक्षाच्या ‘शिवालय’ मध्यवर्ती कार्यालयात दुपारी बारा वाजता घेण्याचे ठरले आहे. दिनांक १७ सप्टेंबरला चंद्रपूर येथे ओबीसी महामोर्चा असल्याने त्यादिवशी होणारी सभा ही १८ सप्टेंबरला पुढे करण्यात आली आहे, हे विशेष.
भद्रावती व वरोरा येथील दोन्ही बैठकांचे आयोजन वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. याप्रसंगी दोन्ही तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना, शिवसेना महीला आघाडी, युवा- युवती सेना व सर्व शाखांचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख व सर्व शिवसैनिक बंधू-भगिनी उपस्थित राहतील. या दोन्ही बैठकीत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी जेष्ठ पदाधिकारी यांनी या बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांनी केले आहे, असे प्रसिध्दी प्रमुख रवि कावळे, किशोर उत्तरवार व जेष्ठ शिवसैनिक माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांनी कळविले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...