Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती तालुक्यात जनसंवाद...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती तालुक्यात जनसंवाद पदयात्रेचा उत्साहात समारोप* *भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*जिवती तालुक्यात जनसंवाद पदयात्रेचा उत्साहात समारोप*    *भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

*जिवती तालुक्यात जनसंवाद पदयात्रेचा उत्साहात समारोप*

 

*भाजप, शे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात जिवती तालुक्यात दि. ३ ते १२ सप्टेबर दरम्यान काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मोठ्या उत्साहात पार पडली. दि. १२ सप्टेबर रोजी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात जिवती येथील विदर्भ महाविद्यालय परिसरातून पदयात्रा सुरू झाली. जिवती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत रामराव महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. शहरात पदयात्रा काढून शेवटी नगरपंचायत रंगमंच येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी जिवती तालुक्यातील भाजप, शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गुडसेलाचे शेतकरी संघटनेचे तुकाराम कांबळे, तुमरीगुडाचे भाजप कार्यकर्ते सरपंच वासुदेव गेडाम,ग्रा. प सदस्य चिनू पाटील कोटनाके, नारपठारचे सुधाकर जाधव यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. धोटे यांनी सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.

या प्रसंगी जेष्ठ काँग्रेस नेते भीमराव पाटील मडावी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, उत्तम कराळे, नारायण वाघमारे, डॉ. अंकुश गोतावळे, अशपाक शेख, भोजूपाटील आत्राम, राम चव्हाण, नामदेव पाटील जुमनाके,महिला काँ. अध्यक्ष नंदाताई मुसने, अनिता गोतावळे, जयश्री गोतावळे, विजय राठोड, दत्ताजी तोगरे, कलीम शेख, शबीर शेख, ताजुद्दीन शेख, डोईफोडेजी, रामदास रणवीर, बाळू पतंगे, मारुती मोरे, दत्ता गायकवाड, बंडू राठोड, गणेश वाघमारे, प्रल्हाद राठोड, बाबाराव कांबळे, साबणेजी, शिंदे मॅडम, कमल जाधव, लहुजी गोतावळे, डॉ. बनसोड, जब्बारभाई, रफिक पठाण, नागनाथ मोठे, भागवत गीते, रवी डफडे, जाधवजी , ठोंबरेजी, केशव भालेराव, मुद्रिका कांबळे, मारुती कोडापे, सुरेश कोडापे, सुनील शेळके, वजीर शेख, गजानन राठोड, प्रवीण राठोड, आशिष दसाने, विष्णू रेड्डी यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम कराळे सर यांनी केले. संचालन डॉ. अंकुश गोतावळे यांनी तर आभार प्रदर्शन सिताराम मडावी यांनी केले.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

जिवतीतील बातम्या

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...