वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ३ ते १२ सप्टेबर २०२३ यादरम्यान जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपीपरी, कोरपना, जिवती या चार तालुक्यात अविरतपणे, मोठय़ा जोमाने जनसंवाद पदयात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दि. १२ सप्टेबर रोजी राजुराचे आराध्य दैवत माता भवानी च्या प्रांगणातून सुरू झाली. लोकप्रिय आ. सुभाष धोटे आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भवानी देवीचे दर्शन, आशिर्वाद घेऊन राजुरा शहरात प्रवेश केला. प्राचीन सोमेश्वर मंदिर येथील शंकरजीचे दर्शन, आशिर्वाद घेऊन पदयात्रा संपूर्ण राजुरा शहरात जनसंपर्क व जनसंवाद करीत गांधी चौक राजुरा येथे पोहचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, खोटे बोला पण रेटून बोला असे सपसेल खोटी आश्वासने देऊन भाजपने केंदात आणि महाराष्ट्रात सत्ता बळकावली आणि आता मानसामानसात, धर्माधर्मात, जातीजातीत तेळ निर्माण करून देश पेटविण्याचे, संविधान संपविण्याचे, देशातील सर्व संपत्ती आपल्या व्यापारी मित्रांना देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भारतीय संविधान, देशाची साधनसंपत्ती, लोकशाही आणि आपल्या प्रिय भारत देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला साथ द्या असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामीजी येरोलवर, अॅड. अरूण धोटे, अशोकराव देशपांडे, हमीदभाई, अॅड. सदानंद लांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुळमेथे, सभापती विकास देवाळकर, मेघाताई नलगे, कुंदाताई जेणेकर, सय्यद सकावत अली, दिनकर कर्नेवार, नंदकिशोर वाढई, साईनाथ बतकमवार, प्रभाकर येरणे, श्याम बोलम, आनंद दासरी, गजानन भटारकर, अभिजित धोटे, संतोष इंदुरवार, जगदीश बुटले, आशीष नलगे, संध्याताई चांदेकर, रामेश्वर ढवस, इर्षाद शेख, उमेश गोरे, संघपाल देठे, धनराज चिंचोलकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, भारत रोहने, रवि त्रिशूलवार, उमेश गोरे, रतन पचारे, भूषण् बानकर, रामचंद्र शेंडे, अरुण लांडे, अशोक राव, रवि आत्रम, निरंजन मंडल, मंहमद वकील, सगर लोहे यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, आजी - माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कृ. उ. बा. स. चे संचालक, तालुका काँग्रेस, महिला कॉंग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले, संचालन कार्याध्यक्ष ऐजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष संतोष गटलेवार यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...