वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व परिसरातील शिवभक्तांसाठी आराध्य दैवत असलेल्या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्वर संस्थानचा विकास व्हावा, या राज्य संरक्षित स्मारकामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मा.ना.सुधीर मुनगंटीवार वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून मंदिराच्या संवर्धनासाठी व सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
याअगोदर ना. मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन राजुरा तालुक्यातील देवाडा येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार, जतन व दुरुस्ती करिता १४ कोटी ९३ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. हे काम मंजुर करण्याकरिता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सिद्धेश्वर मंदिराच्या कामाच्या निविदा मंजूर झाल्या असुन लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुध्दा ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधी कडून मागणी होत होती, त्या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता आता त्याला मोठे यश प्राप्त झाले असून सोमेश्वर मंदिरासाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ हजार निधी मंजूर झाला आहे .यामुळे मंदिराचे जतन व दुरुस्तीचे कामे गतीने पूर्ण होतील असा विश्वास वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील अध्यादेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेंतर्गत सोमेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांच्या अंदाजपत्रकास सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीचे काम तात्काळ होण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली होती. त्यानुसार शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यामध्ये मंदिराचे जतन व दुरुस्ती करणे, दगडी सीमाभिंत बांधणे, जुन्या बांधकाम पृष्ठभागाची रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छता, झाडे- झुडुपे काढणे, ग्राऊंटींग करणे, लोखंडी ग्रील बसविणे, सूचना फलक, माहिती फलक आणि दिशादर्शक फलक बसविणे आदी कामे यामध्ये समाविष्ट आहेत.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वचनपूर्ती केल्याबद्दलमंदिराचे कार्यकारी मंडळ, भगवान महादेवाचे भक्तगण, राजुरा शहर वासीय व परिसरातील जनतेच्या वतीने पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...