आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून आज असंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना वेळेआधी उपचार करून त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो,मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून त्यांचे अविरत कार्य ही अभिनंदनीय बाब असून मी समस्त सावली तालुकावासीय जनतेकडून त्यांचे आभार मानतो--मा.नितीन गोहने, अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी*
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- आज सावली तालुकातील व्याहाड बूज. येथे ग्राम काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने, माजी सरपंच सौ.वंदना गुरनुले,माजी सरपंच मा.पितांबर वासेकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.ही कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडी ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर हा पहिला टप्पा सावली तालुक्यातील नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रूपये खर्च करून 'कर्करोग निदान' करणारी रूग्णवाहिका जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून समस्त जनतेला १५ जून २०२३ ला विशेष प्रयत्नातून जनतेस समर्पित केली.राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग चंद्रपूरात राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. आज व्याहाड बुज येथे तब्बल २२४ नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून डॉक्टरांनी १० रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे. ह्या रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे कॅन्सर तपासणी शिबिराच्या दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी व्याहाड बुज येथील उदघाट्नाला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सभापति पं.स.सावली मा.राकेश पाटील गड्डमवार ,सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे ,व्याहाड बुजचे माजी सरपंच मा.पितांबर वासेकर,माजी सरपंच सौ.वंदनाताई गुरनुले, व्याहाड बूज.महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.अर्चना संगिडवार , ग्रा.पं.सदस्य व्याहाड बुज मा.सुनील बोमनवार, सौ. रुपाली करकाडे, सौ.संगीता जेंगठे,तसेच मा.अनिल गुरनुले,मा.मेहबूब खान पठाण,मा.दीपक गद्देवार ,मा.अनिल पाल,मा.चेतन मोटघरे,मा. संजय चांदेकर,मा.रुमाजी कोहळे,मा.जयंत सांगिडवार ,मा.कवडू ठाकूर, बंडू चिप्पावार,मा.डोमाजी शेंडे, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम ,मा.जगदीश वासेकर आदी उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...