Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *समाजाच्या जडणघडणीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*समाजाच्या जडणघडणीत सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींचे अविस्मरणीय योगदान :- रविंद्र शिंदे*

*समाजाच्या जडणघडणीत सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींचे अविस्मरणीय  योगदान :- रविंद्र शिंदे*

*समाजाच्या जडणघडणीत सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींचे अविस्मरणीय  योगदान :- रविंद्र शिंदे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  भद्रावती:- सेवानिवृत्तीपूर्वी आपण सर्व  शिक्षक बंधू -भगिनींनी  पंचवीस ते तीस वर्षापर्यंत विद्यादानाचे  कार्य अविरतपणे सुरू ठेवले. तुमच्या  मार्गदर्शनामुळेच  हजारो विद्यार्थी अनेक क्षेत्रात यशस्वी होत आहे.  सेवानिवृत्ती नंतर सुध्दा आपण सर्व  गुरूजणांनी आपआपल्या प्रकृतीला सांभाळून  समाजाचे दिशादर्शक म्हणून कार्य करीत राहावे. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. ही आपणास एक नम्र विनंती असून  आम्ही आपल्याला  सदैव सन्मान देत राहू . कारण  समाजाच्या जडणघडणीत सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनिंचे अविस्मरणीय योगदान आहे. आम्ही आपले योगदान कदापिही विसरू शकत नाही. असे प्रतिपादन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.

  स्थानिक श्रीमंगल कार्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने शिक्षक दिनी सेवानिवृत्त  शिक्षक -बंधू भगिनींचा भव्य सत्कार तथा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना  रविंद्र शिंदे बोलत होते. या सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो. थुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आबाजी देवाळकर,विठ्ठल सोनेकर, मदन ठेंगणे, भाऊराव कुटेमाटे, राजेश्वर वैद्य, किसनदेव कोरडे व चंद्रकला पारोधे यांच्यासह प्रा. धनराज आस्वले  उपस्थित होते.

  सर्वप्रथम  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच दिप प्रज्वलीत करण्यात आला.

  स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करतांना सदर सोहळ्याच्या आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. तसेच ट्रस्टच्या कार्याला सर्व सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींनी मार्गदर्शन करावे. असे आवाहन केले.

माला दासगुप्ता यांनी सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींच्या सन्मानार्थ कविता सादर केली.  सोहळ्याचे उद्घाटक आचार्य ना.गो. थुटे यांनी  शिक्षक हा राष्ट्रनिर्माता असल्याचे सांगतांना शिक्षकांच्या दर्जावरून राष्ट्राचा दर्जा ठरत असल्याचे म्हटले. शिक्षकांना विविध भुमिका वठवाव्या लागतात . वर्तमानात राहून भविष्यातील स्वप्न साकार करावे लागतात. रविंद्र शिंदे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून  सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींना दिलेला सन्मान एक अविस्मरणीय क्षण असल्याचे आचार्य ना.गो. थुटे यांनी म्हटले.

      मदन ठेंगणे यांनी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील  शिक्षक या विषयी मार्गदर्शन केले. चंद्रकला पारोधे यांनी शिक्षक हा शिक्षण क्षेत्रातील कर्णधार असल्याचे म्हटले. भाऊराव कुटेमाटे यांनी  रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या ट्रस्ट्रच्या माध्यमातून कोरोना संक्रमण कालावधीत केलेल्या कार्याला उजाळा दिला.रमाकांत देशमुख यांनी  सेवानिवृत्त शिक्षकांचा फार मोठ्या संख्येत सत्कार केल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. तसेच ट्रस्टच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या सोहळ्याचे सुत्रसंचलन डॉ. सुधीर मोते व आभार प्रदर्शन ट्रस्टचे विश्वस्त अनुप कुटेमाटे यांनी केले.

    *बॉक्स*

*भद्रावतीत अविस्मरणीय सत्कार सोहळ्याने  शेकडो गुरुजण भरावले*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक -बंधू भगिनींचा भव्य सत्कार व स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित गुरूजणांचा अत्यंत आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. एकाच वेळी  शेकडो गुरूजणांना सत्कारा दाखल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले. शेवटी सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. ट्रस्ट्रच्या वतीने दिलेला आदर सन्मान बघून उपस्थित शेकडो  गुरूजण अक्षरशः भारावले.*

 

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...