Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शेगावात तरुणांची गांधीगिरी;...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शेगावात तरुणांची गांधीगिरी; रस्त्यातील खड्डय़ात साचलेल्या पाण्यात सोडल्या कागदी होड्या* *रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जन-आक्रोश आंदोलन करू:- अभिजित कुडे* *रस्त्यातील खड्ड्यांमुळे बस बंद : आम्हाला जावे लागते सकाळी पायदळ- श्वेता आत्राम ( विद्यार्थी)*

*शेगावात तरुणांची गांधीगिरी; रस्त्यातील खड्डय़ात साचलेल्या पाण्यात सोडल्या कागदी होड्या*    *रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जन-आक्रोश आंदोलन करू:- अभिजित कुडे*    *रस्त्यातील खड्ड्यांमुळे बस बंद : आम्हाला जावे लागते सकाळी पायदळ- श्वेता आत्राम ( विद्यार्थी)*

*शेगावात तरुणांची गांधीगिरी; रस्त्यातील खड्डय़ात साचलेल्या पाण्यात सोडल्या कागदी होड्या*

 

*रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जन-आक्रोश आंदोलन करू:- अभिजित कुडे*

 

रस्त्यातील खड्ड्यांमुळे बस बंद : आम्हाला जावे लागते सकाळी पायदळ- श्वेता आत्राम ( विद्यार्थी)

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:- तालुक्यातील शेगाव ते चिकणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे मात्र तीन तेरा नऊ अठरा झाले आहेत.  तालुक्यातील खराब रस्त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना आक्रमक झाली आहे.  युवती जिल्हा अधिकारी  तथा सरपंच प्रतिभा मांडवकर  व  युवासेना  सैनिक अभिजित कुडे  यांच्या नेतृत्वाखाली  आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने रस्त्यावर चिखलाचे थैमान झाले आहे. रस्त्यावर जमलेल्या चिखल आणि पाण्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यामुळे दुचाकी वाहने नेहमीच घसरत आहेत.रस्त्याच्या अवस्थेमुळे अनेक अपघात घडले आहेत तरी याकडे संबंधित प्रशासन मात्र साफ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकातून असंतोष व संताप व्यक्त होत आहे. या अनुषंगाने शेगाव रस्त्यासाठी अभिजित कुडे  यांनी 5 निवेदन दिले आहे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने करून मागणी केली होती. परंतु दर पावसाळ्यात रस्त्याचे हेच हाल होत असल्याने खड्डेमय रस्त्याला कंटाळून शेगाव येथील  युवती  व  युवकांच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने या विषयाकडे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात प्रतीकात्मक जहाज सोडून एक अनोखे आगळे-वेगळे आंदोलन केले आहे.  

रस्त्यातील खड्ड्यांमुळे बससेवा बंद झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.  सकाळी 5 ला मुलींना 3 किलोमीटर पायदळ जाव लागत आहे.  या खड्ड्यांमुळे बस बंद करण्यात आली आहे  . विद्यार्थ्यांंना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.  जीव धोक्यात घालून खासगी वाहनांची प्रवास करावा लागतो आहे ही लाजिरवाणी बाब आहे.  ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरले जात आहे.  ग्रामीण भागातील रस्त्याची हीच अवस्था पूर्ण तालुक्यात आहे.  या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग आली नाही तर वरोरा येथे  जन आक्रोश आंदोलन करू असा इशारा सरपंच प्रतिभा मांडवकर यांनी दिला आहे.  तालुक्यातील प्रत्येक गावातील खड्डय़ात आंदोलन करू . या मुर्दाड प्रशासनानेच लक्ष वेधण्या करिता खड्डय़ात कागदी नाव सोडून आंदोलन केले आहे.  अश्या प्रकारे संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत ,विद्यार्थी त्रस्थ  झाली आहे  प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ डांबरीकरण करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना अभिजित कुडे  यांनी दिला.  यावेळी प्रशांत मांडवकर, निलेश सालेकर, प्रतीक सालेकर, रोशन पवार, आदित्य मानकर, अनिकेत मांडवकर,  साहिल चीडे, सुनील सालेकर, मंथन मानकर, गौरव तोडासे, मोहित रोहनकर, मंगेश घोसरे, प्रज्वल धानोरकर, अनिल माकडे ,प्रतिभा मांडवकर, ऋषिका धानोरकर, वैष्णवी निखाडे, वैष्णवी मांडवकर, लक्ष्मी माकडे, सोनू माकडे, श्रेया मांडवकर, समीक्षा किनाके सुहानी  किनाके, श्वेता आत्राम, ममता मांडवकर मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक युवती नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...