वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-राजुरा तालुका बार असोसिएशन राजुरा ची नवनिर्वाचीत कार्यकारणी स्थापित करण्यात आली. या मध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, उपाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर चांदेकर, सचिव ॲड. रवींद्र टिपले सहसचिव ॲड. शंतनु देशमुख, कोषाध्यक्ष ॲड. यशवंत खोके यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
आज दिनांक ०८/०९/२०२३ ला राजुरा बार असोसिएशन राजुरा रजि. न. २४४/२०१० (चंद्रपूर) तह राजुरा जिल्हा चंद्रपूर येथिल ग्रंथालयात मासिक बैठक घेण्यात आली. सन १९५६ मध्ये राजुरा बार असोसिएशन राजुरा ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत दहा अध्यक्षानी आपला यशस्वी कार्यकाळ उत्तमरित्या पूर्ण केला आहे. राजुरा बार असोसिएशन ला खूप जुना इतिहास आहे. अधिवक्ता संघ हे अधिवक्ता आणि लोकाभिमुख कार्यासाठी नेहमीच कार्यशील असतात. मावळत्या कार्यकारणीत अध्यक्ष ॲड. निनाद येरणे, सचिव, उपाध्यक्ष ॲड. राकेश पिंपळकर, सचिव ॲड विजय पुणेकर, सहसचिव अर्पित धोटे, कोषाध्यक्ष सुजित पल्हाळे, सदस्य तुकाराम डवरे, ॲड. विशाल उपरे यांचा समावेश होता.
सन २०२३ पासून पुढील कार्यकाळासाठी नवनिर्वाचीत कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, उपाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर चांदेकर, सचिव ॲड. रवींद्र टिपले, सहसचिव ॲड. शंतनु देशमुख, कोषाध्यक्ष ॲड. यशवंत खोके, सदस्य ॲड. पद्मा मोहितकर, ॲड. वंदना जाधव, यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी उपस्थित अधिवकत्यांकडून नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...