Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *स्व. श्रीनिवास शिंदे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन चित्रकार महेश मानकर यांचा सत्कार* *महेश मानकर यांनी जगातील ३० देशात केले भारताचे प्रतिनिधीत्व*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन चित्रकार महेश मानकर यांचा सत्कार*    *महेश मानकर यांनी जगातील ३० देशात केले भारताचे प्रतिनिधीत्व*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन चित्रकार महेश मानकर यांचा सत्कार*

 

महेश मानकर यांनी जगातील ३० देशात केले भारताचे प्रतिनिधीत्व

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती :-शिक्षक दिनानिमित्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि.५ सप्टेंबर ला स्थानिक श्री मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश मानकर यांचा रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

महेश मानकर हे भद्रावती चे रहिवासी असुन सध्या ते ललितकला विभाग, नागपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचे संपुर्ण शिक्षण कला शाखेतून पुर्ण केले. त्यांच्या काढलेल्या चित्रांना आपल्या देशातच नाही तर जगातील ३० देशात प्रदर्शित करण्यात आले. त्यात १७ चित्रांना पारितोषिक सुध्दा मिळाले आहेत. हे आपल्या देशाचीच नाहितर भद्रावती शहराला सुध्दा अभिमानाची बाब आहे. त्यांच्या याच कार्याला सलाम करण्यासाठी रविंद्र शिंदे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेवुन ट्रस्ट तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रविंद्र शिंदे यांचे सोबत, आचार्य ना. गो. थुटे, सेवा निवृत्त प्राचार्य आबाजी देवाळकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक भाऊराव कुटेमाटे, प्रविण आवारी  आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. सुधीर मोते तसेच आभार प्रदर्शन ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे यांनी केले.

   *बॉक्स*

*रविंद्र शिंदे यानी माझा सन्मान केला याचा मला आदर आहे. त्यांनी दिलेल्या सन्मान चिन्हामुळे भविष्यात मला देशासाठी काम करण्याची उर्जा मिळाली. मला खुप पारितोषिक मिळाले पण मला माझ्या गावातुन सन्मान मिळाला याने मी भारावून गेलो. रविंद्र शिंदे आणि ट्रस्ट ला धन्यवाद.चित्रकार - महेश मानकर

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...