वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती:- देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज दि. ५ सप्टेंबर रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो. थुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे , प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल सोनेकर,सेवानिवृत्त प्राचार्य आबाजी देवाळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन ठेंगणे, भद्रावती तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेश्वर वैद्य, सचिव किसनदेव कोरडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊराव कुटेमाटे , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चंद्रकला पारोधे आणि ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले व्यासपिठावर उपस्थित होते.
याप्रसंगी दिर्घकाल सेवा देऊन जनतेच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते भद्रावती व वरोरा तालुक्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक बंधू - भगिनिंचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे, माजी सैनिक विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, संजय बेलेकर, अजित राम, नमोद रामटेके तसेच ट्रस्टचे सचिव संजय टोगट्टीवार ,प्रशांत कारेकर, प्रविण आवारी, भावना खोब्रागडे, शीला आगलावे, दर्शना तेलरांधे, वच्छला रामटेके, द्वारकाबाई रामटेके, माला दासगुप्ता यांच्यासह फार मोठया संख्येत सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भागिनी व प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सुत्रसंचलन प्रा. डॉ. सुधीर मोते आणि आभार प्रदर्शन ट्रस्ट्रचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे यांनी केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...