Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *जनसंवाद पदयात्रेला...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*जनसंवाद पदयात्रेला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद*

*जनसंवाद पदयात्रेला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद*

*जनसंवाद पदयात्रेला राजुरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली  राजुरा काँग्रेसच्या वतीने राजुरा येथील सोमेश्वर मंदिर येथून सकाळी ६ वाजता जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. प्राचीन सोमेश्वर मंदिरातील भगवान शंकरजीचे दर्शन घेऊन पदयात्रा सुरू झाली. यादरम्यान राजुरा, बामणवाडा, चुनाळा, सातरी, चनाखा, पंचाळा, कोहपरा व विहीरगाव असा २५ किलोमीटर प्रवास करीत ठिक ठिकाणी केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे सरकार पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्यय - अत्याचार याबद्दल जनजागृती करणारे परिपत्रके वाटून, जनजागृतीपर नारे, भजन - किर्तन करून, कार्नर सभा घेऊन नागरिकाशी थेट संवाद साधण्यात आला. सकाळी राजुरा येथून सुरू झालेली पदयात्रा दुपारी सातरी येथे पोहचली. येथे भोजन उरकून लगेच पुढील प्रवासाला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात विहीरगाव येथे पोहचून पदयात्रेचा पहिला दिवस पुर्ण होईल. संध्याकाळी विहिरगाव येथे सभा पार पडले व पदयात्रेत सहभागी सदस्य येथेच मुक्काम करून उद्या पून्हा दुसर्‍या दिवशीच्या प्रवासाला निघण्याचे नियोजन आहे.

     या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे जेष्ठ विधीतज्ञ तथा कृ. उ. बा. स. संचालक अॅड. अरूण धोटे, अभिजीत धोटे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवादलाचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, माजी जि प सदस्या मेघाताई नलगे, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, आशिष नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, प स सदस्य तुकाराम माणूसमारे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, दिपा करमनकर, सागर लोहे, कविता उपरे, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, इंदूताई निकोडे, अर्चना गर्गेलवार, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रणय लांडे, इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, अशोक राव, यश मोरे, संदीप आदे, सर्वानंद वाघमारे, भाष्कर चौधरी, श्याम गरडे, मारोती मोरे, पंचाळा सरपंच शोभा मडावी, उपसरपंच आकेश चोथले, माजी सरपंच सुधाकर गिरसावळे, योगिता मून, आनंदराव गावंडे, कोहपराचे सरपंच राजेश मेश्राम, उपसरपंच पुजाताई शेषराव मडावी, माजी सरपंच वर्षा पिंगे, संजय कुळमेथे, पुरुषोत्तम पिंगे, सुनिल पिदुरकर, विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, रविकांत होरे, प्रभाकर साळवे, मनोहर धुळसे यासह राजुरा तालुका काँग्रेस, महिला कॉंग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...