*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गडचादुंर:-कोरपना तालुक्यातील नांदा येथील 'यशोधन विहार'ला टॅक्स लागू करा,अशी मागणी काही दिवसांपूर्वी नांदा येथील मारोती बुडे यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. लोकहिताची मागणी असल्याने सदर निवेदनाच्या मजकुरा प्रमाणे काही न्युज पोर्टलच्या पत्रकारांनी बातमी प्रकाशित केली. वास्तविक पाहता यात काहीही गैर नसताना केवळ मुस्कटदाबी करण्याच्या उद्देशाने 'यशोधन विहार' कडून 'कोरपना Live संपादक सैय्यद मुम्ताज़,विदर्भाचा वीर संपादक गौतम धोटे,भारतीय वार्ता दिनेश झाडे,या 2 दलित आणि 1 मुस्लिम,असे 3 पोर्टलच्या पत्रकारांना नुकसान भरपाई म्हणून चक्क 3 कोटींची नोटीस बजावण्यात आली.यापुर्वी अनेकदा मोठमोठ्या वृत्तपत्रात 'यशोधन विहार' संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या मात्र, पोर्टलच्या या 3 पत्रकारांनाच टार्गेट का करण्यात आले ? याविषयी उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले असून या मागचे खरे सूत्रधार दुसरेच ! असल्याची धक्कादायक माहिती आता ठिकठिकाणी नागरिकात सुरू असलेल्या चर्चेतून समोर येऊ लागली आहे.
'यशोधन विहार' आणि पत्रकारांच्या त्या नोटीस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक अनपेक्षित गोष्ट समोर आली आहे.राजुरा येथील पोर्टल संपादक 'दीपक शर्मा' यांनी 'आमचा विदर्भ' नामक त्याच्या पोर्टलवर,3 कोटीची नोटीस आलेल्या पत्रकारांना थेट 'वसूलीबाज' म्हणून संभोधले आहे.असे अनेक आक्षेपार्ह बिनबुडाचे थेट आरोपयुक्त मजकूर यांना उद्देशून 'शर्मा' यांनी आपल्या न्यूज पोर्टलमध्ये प्रकाशित केल्याचे म्हणत जाहिरातीच्या लालसेपोटी दुसऱ्याने लिहून दिलेल्या स्क्रिप्टमधील शब्दांची व्यवस्थितपणे शहानिशा न करता या पोर्टल संपादक,तथाकथित पत्रकाराने आम्ही थेट वसूलीबाज असल्याचा दावाच त्याच्या पोर्टल बातमीतून केला आहे.आता बघा तीच बातमी 'दीपक शर्मा'च्या अंगलट येण्याच्या मार्गावर असल्याचे पत्रकार झाडे,धोटे,यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता व कोणतेही अधिकृत पुरावे नसताना केवळ आणि केवळ दुसऱ्याच्या इशाऱ्यावर 'शर्मा' यांनी आम्हाला थेट 'वसूलीबाज' पत्रकार म्हटल्याने आमच्या सारख्या वर्षानुवर्षे प्रामाणिकतेने पत्रकारिता करणाऱ्या निष्कलंक पत्रकारांची समाजात नाहक बदनामी झाल्याची खंत सुद्धा यांनी व्यक्त केली आहे.
*'कर नाही तर डर कशाचे'*
मागील अंदाजे 25 वर्षांपासून मी पत्रकारीता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करीत आहो.तोंडी आरोप प्रत्येक क्षेत्रात होत असतात,मात्र शर्मा यांनी केवळ जाहिरात व गडचांदूर येथील संधिसाधू,स्वयंघोषीत नेता आणि नांदा येथील 2 पत्रकारांच्या इशाऱ्यावर मला लेखीस्वरूपात, ज्या प्रकारे थेट वसूलीबाज पत्रकार म्हटले आहे, म्हणजे शर्माकडे याचे अधिकृत पुरावे असणारच ? म्हणूनच आता शर्मा यांनी येत्या 8 दिवसाच्या आत माझ्यावर केलेल्या थेट आरोपांचे अधिकृत पुरावे सादर करावे,जर पुरावे नसेल तर माझी जाहीरपणे माफी मागावी' अन्यथा,मी लवकरच संवैधनिक मार्गाने कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलत अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे.याविषयीची नोटीस सुद्धा नुकतीच वकिलामार्फत 'दीपक शर्मा'ला पाठवली आहे.याच बरोबर 'केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातही सदर प्रकरणी तक्रार दाखल केली असून 'शर्मा' यांनी माफी न मागितल्यास म्हटल्याप्रमाणे मी कायदेशीर कारवाई करणारच,यात दुमत नाही. 'कर नाही तर डर कशाचे' असे ठाम मत 'कोरपना Live' संपादक सैय्यद मुम्ताज़ अली यांनी व्यक्त केले आहे.
यासर्व घडामोडी बघता 'एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला' अशाप्रकारे नोटीस पाठवल्याचे बहुतेक हे पहिलेच प्रकरण असावे,अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.आता पुढे काय-काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...