Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / पट्टेदार वाघाचा कचराळा...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

पट्टेदार वाघाचा कचराळा परिसरात धुमाकूळ : ग्रामस्थ दहशतीत वाघाचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

  पट्टेदार वाघाचा कचराळा परिसरात धुमाकूळ : ग्रामस्थ दहशतीत      वाघाचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

 

पट्टेदार वाघाचा कचराळा परिसरात धुमाकूळ : ग्रामस्थ दहशतीत

 

 

वाघाचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

 

 

बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

 मो. ७७५६९६३५१२

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : तालुक्यातील तथा भद्रावती वनपरिक्षेत्रात येत असलेल्या मौजा कचराळा गाव परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थ या वाघाच्या दहशतीत आहे. वन विभागाने लागलीच वाघाचा बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कचराळाच्या वतीने वनविभागाला देण्यात आले आहे.

 

कचराळा हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच्या जंगल शेजारी असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या जागेवर काटेरी व झुडपी जंगल निर्माण झाले आहे. या परिसरात पाच ते सहा पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे निवेदनात नमूद असून सदर बाब शेतकरी, गुराखी व नव्याने वसलेल्या एसएमएस कंपनीच्या कामगारांच्या व मजुरांना दररोज दिसत असल्याचे म्हटले आहे.

 

काही दिवसांपूर्वी कचराळा येथील पाळीव प्राण्यांना देखील वाघांनी भक्ष केले असल्यामुळे पुढे मानवी जीवित हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. गावकऱ्यांना शेतात जाणे-येणे करणे भीतीचे व कठीण झाले आहे. या परिसरातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत असून त्वरित या वाघाचा बंदोबस्त करावा अशा निवेदन सरपंच भाग्यश्री येरगुडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना दिले. याप्रसंगी गावातील उप सरपंच छत्रपती एकरे, सदस्य जगन्नाथ पायताडे, सचिन माऊलीकर, सुनीता चुदरी, पुष्पा येरगुडे, सीमा कुलमेथे, वन समितीअध्यक्ष राकेश येरगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यभान येरगुडे, सामाजिक कार्यकर्ता संदीप निखाडे, भय्याजी बोबडे, यादव भगत, तुळशीदास ठुनेकर, बाबा येरगुडे, नागो चुदरी, दत्तू सोमलकर, विठ्ठल आवारी, सुमित्रा सोमलकर, सुमित्रा धोबे, अंजनाबाई बोबडे, अंजनाबाई कोडापे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...