Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *कान्सा ( शिरपूर )च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*कान्सा ( शिरपूर )च्या बहुसंख्य ग्रामस्थांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश* *जागा उपलब्ध करुन द्यावी, गावातील युवकांसाठी “ स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय ” सुरू करू :- रविंद्र शिंदे* *ग्रामस्थानी एक हाक द्यावी, शिवसैनिक आपल्या मदतीसाठी सदैव तत्परआहे :- रविंद्र शिंदे*

*कान्सा ( शिरपूर )च्या बहुसंख्य ग्रामस्थांचा  शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश*    *जागा उपलब्ध करुन द्यावी, गावातील युवकांसाठी  “ स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय ” सुरू करू :- रविंद्र शिंदे*    *ग्रामस्थानी  एक हाक द्यावी, शिवसैनिक आपल्या मदतीसाठी सदैव तत्परआहे :- रविंद्र शिंदे*

*कान्सा ( शिरपूर )च्या बहुसंख्य ग्रामस्थांचा  शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश*

 

*जागा उपलब्ध करुन द्यावी, गावातील युवकांसाठी  “ स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय ” सुरू करू :- रविंद्र शिंदे*

 

ग्रामस्थानी  एक हाक द्यावी, शिवसैनिक आपल्या मदतीसाठी सदैव तत्परआहे :- रविंद्र शिंदे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला आब व सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण हे ब्रीद जोपासत त्यांचे जनसेनेचे  कार्य सतत सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यातील 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे काम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राधान्य  देवून करीत आहे. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.

भद्रावती तालुक्यातील जवळपास 500 लोकसंख्या असलेले कान्सा ( शिपूर )  गाव. गावात असंख्य सार्वजनिक  समस्या आहेत. गावातील समस्या रविंद्र शिंदे मार्गी लावू शकतात. हा दृढ विश्वास मनात ठेवीत यांना साथ द्यायची असे ठरवित कान्सा ( शिरपूर ) गावातील बहुसंख्य जेष्ठ, युवा, महिला यांनी शिंवबंधन बांधीत पक्ष प्रवेश घेतला.

विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनात, भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल व नंदोरी-कोकेवाडा विभाग प्रमुख हरीभाऊ रोडे यांच्या नेतृत्वात अनिल मत्ते, पुरुषोत्तम चौधरी, विकास मत्ते, शेखर घुगुल, प्रशांत पिदुरकर, शंकर रोडे, वसंता मत्ते, विलास गेडाम, वामन रोडे, देवराव पिदुरकर, विजय आसुटकर, भास्कर मत्ते, भास्कर पिदुरकर, प्रकाश मत्ते, सुनिल रोडे, ललीत पिदुरकर, गजानन कुंभारे, अजय आसुटकर, अक्षय चौधरी, नंदकिशोर रोडे, सुनिल मत्ते, प्रविण टोंगे, विकास नैताम, केशव पेंदाम, मारोती निखाडे आणि  राजु आसुटकर तसेच महिला वर्गातून बयनाबाई गेडाम, कुसुम रोडे, मंदा पिदुरकर आणि शारदा आसुटकर आदीनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला.

या पक्षप्रवेश सोहळयाला भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु गार्गी, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मत्ते, महादेव रोडे, नामदेव टोंगे, संजय किन्नाके, रामराव मडावी, जयदीप मिलमिले, महादेव आसुटकर, मंगला झाडे, ‍शशिकला टोंगे, गिता मत्ते तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक, जेष्ठ, युवा व महिला वर्ग फार मोठया संख्येत  उपस्थित होते.

या पक्षप्रवेश प्रसंगी “कान्सा गावकऱ्यांनी वाचनालयाकरीता गावात जागा द्यावी, मी गावातील युवक- युवतीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे वाचनालय सुरू करणार आहे .” असे विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे म्हणाले, तसेच गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता प्राधान्याने कार्य करेन .असे पुढे म्हणाले.

रविंद्र शिंदे यांनी याप्रसंगी कान्सा गावातील सरपंच मयुर टोंगे यांची प्रकृती बरी नसल्याने कार्यक्रम समारोपा नंतर मयुर टोंगे यांच्या घरी जावून प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कोणतीही आरोग्याविषयक मदत लागल्यास शिवसैनिक सदैव तत्पर आहे, फक्त एक हाक द्या, सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...