Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रा पूर्वतयारी नियोजन बैठक संपन्न* *जिल्हा परिषद क्षेत्रानुसार प्रत्येक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यावर नियोजनाची जबाबदारी*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रा पूर्वतयारी नियोजन बैठक संपन्न*    *जिल्हा परिषद क्षेत्रानुसार प्रत्येक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यावर नियोजनाची  जबाबदारी*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद पदयात्रा पूर्वतयारी नियोजन बैठक संपन्न*

 

जिल्हा परिषद क्षेत्रानुसार प्रत्येक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यावर नियोजनाची  जबाबदारी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक २९ ऑगस्ट २०२३

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जनसंवाद यात्रा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. विरोधी पक्षनेते व माजी मंत्री मा.आमदार.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार,  सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ही यात्रा काढण्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली होती.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर दि. 3 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान 'जनसंवाद पदयात्रा' चे आयोजन करण्यात येते आहे. ही जनसंवाद पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असून पदयात्रेच्या माध्यमातून सावली तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून राष्ट्रीय, राज्य पातळी ते स्थानिक पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, शासन पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार व अन्य समस्यांवर जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे अशी माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर दररोज किमान 25 किलोमीटरची असेल, या यात्रेचे नियोजन खालील प्रमाणे असेल. पदयात्रेची सुरुवात सकाळी 6 वा. प्रार्थना होईल. सकाळी 6.30 ते 9.30 वा. पदयात्रेचा पहिला टप्पा सुरु होईल. सकाळी 9.30 ते 12 वा. भोजन व विश्रांती असेल, दुपारी 12 ते 2 वा. जाहिर सभा, दुपारी 2 ते 3 वा. विश्रांती, दुपारी 3 ते 4 वा. भेटीगाठी, सायं. 4 ते 7 वा. पदयात्रेचा दुसरा टप्पा पार पडेल, सायं. 7.30 ते 9.30 वा. जाहिर सभा, रात्री. 1.30 ते 10.30 वा. भोजन व रात्री मुक्काम असे एकूण नियोजन असेल. या पदयात्रेत जिल्हा परिषद क्षेत्रानुसार  पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी व्हायचे आहे. जनसंवाद पदयात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 3 सप्टेंबर 2013 रोजी सुरु करण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात महापुरुष्यांच्या पुतळ्यांना वंदन करून तसेंच ऐतिहासीक स्थळापासून होईल. यात्रेत सावली तालुका काँग्रेसचे  पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल व विभाग संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश असेल. जिल्हा परिषद क्षेत्रानुसार प्रत्येक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यावर नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही यात्रा लोकभावना जाणून घेण्यासाठी असल्याने यात्रेत महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी मुद्दे व स्थानिक पातळीवरील जनसामान्यांचे प्रश्न, मुद्यांबाबत लोकांसोबत संवाद साधण्यात येईल.

यावेळी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, माजी प.स.सभापती मा.विजय कोरेवार, सावली नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा.किशोर कारडे, सावली युवक शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,न.प.सावलीच्या बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे व उपसरपंच सौ.भावना बीके नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार, मा.सचिन सांगिडवार, नगरसेविका सौ.सिमा संतोषवार, प्रियंका रामटेके, तसेच चिचबोडीचे सरपंच मा.सतीश नंदगीरवार, मा.अनिल म्हशाखेत्री,मा.श्रीकांत बहिरवार, मा.खुशाल लोडे,मा.अरुण येरमलवार,मा.दिलीप लटारे,मा.अरविंद भैसारे,मा.शरद कन्नाके, सौ.शिला गुरुनुले मा.सुशील डहलकर, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम ,मा.नितेश जुवारे, मा.कुसुमाकर वाकडे तसेच तालुका काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...