संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
या इमारतीतून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल - आमदार प्रतिभाताई धानोरकर
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
भद्रावती : तालुक्यातील बेलगाव भु. येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोमवार दि. २८/८/२३ ला आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीतून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करीत आपण नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण कटिबद्ध असून, मतदार संघातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरंपच भारती आगलावे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, उपसरपंच जयेंद्र मगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहीन सय्यद, उपविभागीय अभियंता झाडे, तंमुस अध्यक्ष जोत्स्ना आत्राम, व्यंकेश बदकी, मुख्याध्यापक खाडे, भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे, सुधीर मुडेवार, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, संध्या बोकडे, वंदना नन्नावरे, तलाठी शिंदे, सुशीला भागवत, सामुदायिक आरोग्य अधिकारी बेबी बोरपे, आशा वर्कर योगीता गंधारे, खोकरीचे सरपंच स्वप्नील पानतावणे, कृउबासचे संचालक प्रवीण बांदूरकर, राजू आसुटकर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घागी आदी उपस्थित होते.
प्रास्तविक डॉ. संजय आसुटकर यांनी केले. संचालन प्रफुल्ल वाभिटकर यांनी केले. तर आभार किशोर पांढरे यांनी मानले.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...