आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ट्रस्टच्या :- स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत घेतले दत्तक
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती:-शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख तथा स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथील कोरोना संक्रमण कालावधीत पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना मदतीचा हात देत शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले. या तीघांनाही ट्रस्टद्वारे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वितरीण करण्यात आले.
या प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा .धनराज आस्वले आणि ट्रस्टच्या विश्वस्त तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
चंदनखेडा येथील माणिक बागेसर यांचे कोरोना संक्रमण कालावधीत निधन झाले. घरचा कर्ता पुरुष अचानक निघुन गेल्याने माणिक बागेसर यांची पत्नी सुजाता, दोन मुल प्रशिक आणि आरोहण आणि मुलगी आकांशा यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा झाला. सुजाता बागेसर यांच्या पुढे मुला - मुलींच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली. चंदनखेडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते यांच्या मार्फत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा सोबत संपर्क साधण्यात आला. विठ्ठल हनवते यांनी सुजाता बागेसर आणि त्यांच्या तीन मुला - मुलींची शैक्षणिक अडचण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या कानावर टाकली.रविंद्र शिंदे यांनी तीनही भावंडाना ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेवून त्यांचा शैक्षणिक कार्याचे दायित्व स्विकारले. या दायित्वानुसार तीघांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रशिक हा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, आरोहण हा दहाव्या तर आकांशा ही सातव्या इयत्तेत चंदनखेडा नेहरु विद्यालयात शिक्षण घेत आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...