आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- कोरपना महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मार्फत कामगारासाठी सुरक्षा संच किट व रोख रक्कम १०,००० देण्याची योजना २०१८ पासून अमलात आली व २०२० मध्ये महाराष्ट्रराज्यभर तक्रारी झाल्याने कागदोपत्री योजना २०२० पासून बंद झाल्याचे दाखविण्यात आले मात्र या विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगणमताने विक्रमी बोगस लाखो मजुरांची नोंदणी करण्यात आली वास्तविक हे कामगार इमारत बांधकाम कामावर जातच नाही असे असताना या योजनेची कामगारांच्या नावाने टाळू वरील लोणी खाण्यासाठी शासनाचे नियम निकष धाब्यावर ठेवून कोट्यावधी रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा न करता परस्पर आर्थिक घोटाळा करण्यात आला, साहित्य निकृष्ट दर्जाची असून शासनाने चढ्या दराने निविदा मंजूर करून गैरव्यवहार केला याबाबत कामगार मंत्री सचिव यांच्यासह पोलीस महासंचालक डॉ यांना दि. २६/०६/२०२३ ला तक्रार दिली व हा गैरव्यवहार किती मोठा आहे याबाबत जागरूक आमदारांना घोटाळ्याची व्याप्ती अवगत करून दिली विधानसभेत लक्षवेधी व औचित्यत्याचा मुद्दा आमदार विजय वडेट्टीवार व मनोहरराव चन्द्रीकापुरे किशोर जोरगेवार इतरांनी गंभीर प्रश्न उपस्थित करून दि. २४/०७/२०२३ ला प्रशासनाचे लक्षवेधून खडबड उडऊन दिली मात्र मंत्री सुरेश खाडे यांनी जे अधिकारी या गैर व्यवहारात सामील आहे यांच्याकडूनच चौकशीची घोषणा करून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला मात्र भ्रष्टाचारी अधिकारी व पुरवठा दार एजन्सी यांना काही फरक पडणार नाही असे चित्र निर्माण झाले कारण चोरी व गैरव्यवहार करणारेच चौकशी व अहवाल देणार असेल तर? असेअसताना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव इमारत बांधकाम मंडळ मुंबई यांनी दि. १३/०७/२०२३ रोजी पत्र क्रं. १०४७ प्रं.क्रं. २९४ नुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या सुरक्षा किट घोटाळा गैरव्यवहार चौकशी करण्याचे निर्देश कामगार उपायुक्त अमरावती यांना दिले आहे. विभागीय स्तरावर चौकशी पथक गठीत करण्यात आले व चौकशी कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असले तरी योजनेतील गैरव्यवहार घोटाळा मोठा असून योजना बंद झाल्यानंतर सन २०२३ मध्ये वर्धा, गंगाखेड, परभणी येथे वाटप करण्यात आले कसे? योजना बंद झाली असताना साहित्य आले कुठून कमिशन साठी बोगसमजूर नोंदणी करीतअपूर्ण निकृष्ट साहित्य पुरवठा हा घोटाळा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार झाला व राज्यातील चांद्यापासून तर बांधापर्यंत कंत्राटदारासह अधिकाऱ्यांचे हात ओले झाले तेव्हा कामगार विभागच काय चौकशी करणार मा. मुख्यमंत्री मा.उप मुख्यमंत्री व कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे निवेदन देऊन विशेष पथक निर्माण करूण पथकामार्फत विशेष चौकशी करून पुरवठादार गुनिना कमर्शियल प्रा.ली. व इंडो अलाईड फुड्स प्रा. लि. व सहाय्यक कामगार आयुक्त यानचेवर गुन्हे दाखल करून यापूर्वी दोशी असलेल्या वर्धा व उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हे दाखल होऊ न सुद्धा कसूरदार मोकाट हिंडत आहे या कृत्यामुळे कामगारांची फसवणूक झाली असून मोठा गैरव्यवहार झालं असल्याने राष्ट्रवादीचे नेते अबिद अली यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजणार अटळ आहार योजना व सुरक्षा किट संच हा प्रकार व बोगस नोंदणी अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगणमताने झाली आहे. कंत्राटदार कंपनी यांनी नोंदणी कागदपत्र निविदा बीट तथा शासनाने टाकून दिलेले अटी व शर्ती भंग करून गैर व्यवहार केला आहे सदर बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अबिद अली यांनी दिली
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...