संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती पोलिसांनची कारवाई - दहा आरोपीसह पाच लाखाचा मध्देमाल जप्त.
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत जुगार खेळणाऱ्या दहा आरोपींना भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे शहरातील सुमठाना परिसरातील एका घरात करण्यात आली. या कारवाईत मोबाईल, मोटरसायकल व नगदी रकमेसह एकूण चार लक्ष ९७ हजार,८७० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या १० आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमठाना परिसरातील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे दहा व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख ३० हजार ६७० रुपये, आठ मोबाईल व पाच मोटरसायकली असा ४ लक्ष ९७ हजार,८७० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात अंमलदार शशांक, अनुप, विश्वनाथ, निकेश व योगेश आदींनी केली.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...