भाजपा युवा मोर्चा तर्फे सदस्यता नोंदणी अभियान.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते अंगणवाडी चे दुरुस्ती व सौदयकरण विकासकामाचे लोकार्पण करण्यात आले. अंगणवाडीची जुनी इमारत खराब झाल्याने सरपंच वाढई यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पाठपुरावा करून अंगणवाडी दुरुस्ती व शुशोभिकरण करण्यासाठी निधी मंजूर करुन येथे अंगणवाडीची नव्याने दुरुस्ती व सौदयकरण करुन घेतल्यामुळे गावकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बाल शिक्षणाचा पाया म्हणजे अंगणवाडी असून बालकांमध्ये सुसंस्कार रुजविण्यासाठी गावातील अंगणवाडी सुसज्ज व सक्षम असावी या भुमिकेतून आपण या विकासकामासाठी आग्रह धरला. आपल्या छोट्याशा प्रयत्नाने गावातील बालकांच्या शैक्षणिक व भावी सर्वांगीण विकासाला चालना मिळेल याचे समाधान आहे.
या प्रसंगी पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे, माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पिंपळशेंडे, जेष्ठ नागरिक आनंदराव बोढाले, सुरेश गौरकार, वसंता सपाट, लटारी गौरकर, अनिल मेश्राम, सुधाकर पिंगे, गंगाधर पेंदोर, मारोती वाढई, समाधान पेटकर, रावजी वाढई, लक्ष्मण आत्राम, ग्रामसंघाचे अध्यक्ष मिना भोयर, अंगणवाडी सेविका लता क्षीरसागर, उमेद संगीता उमाटे, मजुशा आबिलकर, मंजुळा बोढाले, मिराबाई ताजणे, सुमण साळवे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे, श्रावण गेडाम यासह समस्त गावकरी उपस्थित होते.
वणी:- वणी येथे भारतीय युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा भाजपा सदस्यता नोंदणी अभियान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या...
वणी - एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले...
वणी:१०४ सुवर्ण पदक स्केटिंगमध्ये पटकावणारी बोटोणी येथील मनस्वी पिंपरे ही गुरुवारी (दि. 23) बोटोणी ते वणी 30 किमी. अंतर...
वणी : वणी शहरात सौंदर्याकरण साई मंदिर ते टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात करण्यात आले. यामध्ये मध्यभागी...
वणी:- हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त...
वणी:- वेकोलीच्या उकणी खान परीसरात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मृत वाघाचे...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...