आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
सावली शहरातील नागरिकांना १००% नवे नळ कनेक्शनचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी केले आवाहन
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-दिनांक२३ ऑगस्ट २०२३राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अंगी जोपासलेले " जनसेवा हिच ईश्वरसेवा" हे व्रत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रामाणिकपणे पार पाडत असतात. नुकतेच नगर पंचायत सिंदेवाही तर्फे स्वर्गरथ मोफत देण्याचा सेवाभावी निर्णय नगरपंचायत सिंदेवाहीचे नगराध्यक्ष मा.स्वप्नील कावळे यांनी घेतला, त्यांचा या सेवाभावी निर्णयायचे स्वागत करीत ,सावली शहरातील कुणाच्याही घरी आकस्मिक असो वा आजारपणामुळे असो किंवा कोणत्याही कारणाने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नगर पंचायत सावलीतर्फे "स्वर्गरथ" सुविधा मोफत देण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार यांनी घेतला आहे. 'स्वर्गरथा' साठी यापुढे कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे यापूर्वी स्वर्गरथाकरिता नगर पंचायत सावलीतर्फे ५०० रुपये नामपात्र शुल्क आकारण्यात येत होते.मात्र यापुढे स्वर्गरथाकरिता कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. स्वर्गरथासाठी लागणारा खर्च दिनांक २३/०८/२०२३ पासून तर ते उपनगराध्यक्ष पदावर असे पर्यंत स्वतः मा.संदीप पुण्यपकार करणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व नगरसेवकांनी स्वागत केले आहे.
तसेच ४ महिन्यापासून सावली शहरात जे नवे नळ कनेक्शन योजना सुरु आहे त्याची गती मंदावली असून उपनगराध्यक्ष या नात्याने त्यांनी सावली नगर पंचायतीतर्फे लवकरात लवकर सावली शहरातील नागरिकांनी १००% नळ कनेक्शनचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नगर पंचायत सावलीला सहकार्य करावे असे सावली शहरातील सर्व जनतेला आवाहन केले आहे.
जेवापासून सावली शहरात नवीन नळ कनेक्शन लावण्याचे काम सुरु झाले आहे तेवा पासून उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार यांच्या वॉर्ड क्र.१३ मधील ५०० रुपये पाणी कर स्वरूपात ते भरत आहेत, तरी सुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असून १०० % उदिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता आपल्या वॉर्ड क्र.१३ मधील सर्व नागरिकांचे नव्या नळ कनेक्शन योजने अंतर्गत स्वतः ५०० रुपये कर भरणार आहेत यामुळे नागरिकांना महागाईच्या काळात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले, या निर्णयामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक केल्या जात आहे.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...