Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / ताडाळीत इतिहास पहिल्यांदा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

ताडाळीत इतिहास पहिल्यांदा ग्रामसभेचा झाला कोरम पूर्ण*

ताडाळीत इतिहास पहिल्यांदा ग्रामसभेचा झाला कोरम पूर्ण*

*उपसरपंच निकिलेश चामरे यांच्या जनजागृती प्रयत्नांना यश*

 

     

चंद्रपुर जिल्ह्यात येथील मौजा ताडाळीग्रामपंचायत

तडाली: 

 ग्रामसभा ही गावची संसद म्हणून ओळखली जाते. पण ग्रामसभेबाबत गावातील लोक आजही जागरूक नाही असे चित्र दिसते. ताडाळीत गेले अनेक वर्ष ग्रामसभा बाबत लोक जागरूक नव्हते. पहिल्यांदा एतिहासिक ग्रामसभा गावात रंगली.  

     गेली अडीच वर्ष गावात अपक्ष सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक ग्रामसभा आणि वार्ड सभा अगोदर उपसरपंच निकिलेश चामरे हातात माईक आणि घंटागाडी घेऊन संपूर्ण गावात पायदळ फिरत जनजागृती करून लोकांना ग्रामसभेत येण्यासाठी तळमळीने आव्हान करायचे,पण त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच अपयश यायचे. तेव्हा लोक त्यांच्यावर  मुर्खात काढून हसायचे.

   यांच्या सोबतीला हळूहळू सामाजिक कार्यकर्ते शिवदास शेंडे यांनी साथ देण्याचे ठरवले. जनजागृती करायला सुरुवात केली. प्रत्येक ग्रामसभा ही 100 लोकांचा कोरम पूर्ण न झाल्याने बरखास्त व्हायची. यामुळे बरखास्त ग्रामसभा घेण्यात येत होती व त्यात लोकांना अध्यक्षाच्या वतीने वेळेवर त्यांचे मुलभुत गरजांशी संबंधित विषय मांडता येत नव्हते,पण यावेळेस क्रांती झाली.  100 लोकांच्या पार आकडा जाऊन 200 लोकांच्या जवळपास लोक सभेत उपस्थित झाले. सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाली, एक उर्जाग्राम व एक ताडाळी आशा कार्यकर्त्यांची निवड झाली, अवैद्य - वैद्य दारूबंदीचा मुद्दा चांगलाच रंगला आणि एकमताने सभेत दारूबंदीचा एतिहासिक ठराव घेऊन निर्णय झाला. दारू विकणाऱ्या व्यक्तिला शासकीय योजनांचा लाभ देण्यात येऊ नये. दारू विकणाऱ्यासोबत पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचे आर्थिक हितसंबध आढलून आल्यास पोलिस अधीक्षक मार्फत त्यांना निलंबित करून कायदेशिर कार्यवाही करावी असे मुद्दे ठरावात घेण्यात आले. महिला दारूबंदी बाबत यावेळी आग्रही होत्या. पोलीस चौकी गावात राहीली पाहिजे आणि तिथे पोलीस पण ड्युटी वर राहिले पाहिजे. ताडाळी एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये स्त्री व पुरुष दोघांना पण रोजगार साठी प्राधान्य देण्यात यावे. 15 वित्त आयोग बाबत चर्चा झाली, मोदी आवास योजना, रमाई, शबरी व NT घरकुल लाभार्थी यांची निवड करण्यात आली. विविध योजनेबददल माहिती देण्यात आली. रोजगार हमी योजना बाबत कामे निवड चर्चा झाली.

    अध्यक्षाच्या वतीने वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये पहिल्यांदाच लोकांनी आपल्या मूलभूत गरजा जसे पाणी, लाईन, रोड, नाली अश्या अनेक

विषयावर स्वतः चे मुद्दे मांडले. खऱ्या अर्थाने आता गावात लोकशाही आली. लोकांचे राज्य आले असे गावकऱ्यांना पण वाटायला लागले आहे." गाव करी,  ते राव न करी ! म्हणीप्रमाणे आज ग्रामसभा रंगली व लोकांनी हक्काने आपले मुद्दे मांडले.

   गावात पिण्याचे शुद्ध पाणी नाही. लाईन वारंवार खंडित होते. वनविभागाचा पैसा खर्च केला नाही. अश्या अनेक समस्या गौतम कासवटे, कैलास सूरपाम, प्रीती आवळे, आकाश चिवंडे, सुदर्शना बूच्चे, सानिया कासवटे इतर लोकानी आपल्या समस्या मांडल्या. अनेक समस्यामुळे जनता त्रस्त आहे. सरपंच यांनी याही ग्रामसभेत लोकांच्या प्रश्नांची उत्तरे नीट दिली नाही. यामुळे लोकांचे समाधान होत नसल्याने लोकांचा आक्रोश सरपंच यांचेवर वाढत चालला आहे. सोबताच सचिव यांचे सुद्धा गावातली विकास कामे आणि पाठपुरावा याकडे हलगर्जीपणा व दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

  या ग्रामसभेला एतीहासिक बनवण्यासाठी प्रीती आवळे, सुदर्शना बूच्चे, सपना पेटकर यांनी घरोघरी फिरून महिलांनी ग्रामसभेत येण्यासाठी जागृती केली. गावातील दारुबंदी साठी सर्व आग्रही महिला तसेच गुरुदेव सेवा मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असे यावेळी गावकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...