*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :-राष्ट्रवादी काँग्रेस चे भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी गौतम वानखेडे यांची धानोली येथील सर्व्हे क्रमांक 252 आराजी 0.75 है. आर ही शेतजमीन 50 लाखांत विकत घेतली मात्र त्यांनी केवळ 22 लाख नगदी व 3 लाखांचे सहा महिन्यांनंतर चे चेक देऊन उर्वरित 25 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत असल्याने व पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी देत असल्याने पिडीत शेतकरी गौतम वानखेडे यांनी त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत जिल्हा उपनिबंधक व राष्ट्रीय अनुसूचीत जाती व जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती चंद्रपूर येथील प्रेस क्लब येथे घेतलेल्या 22 आगस्ट च्या पत्रकार परिषदेत दिली.
मौजा धानोली येथील सर्व्हे क्रमांक 252 आराजी 0.75 है. आर ही शेतजमीन गौतम वानखेडे यांनी तिथे प्लाट पाडून विकण्यासाठी तहसीलदार भद्रावती यांच्याकडे सन 2019 मध्ये एन ए ( निवासी प्रयोजनासाठी अकृषक करिता ) मंजुरी साठी अर्ज दाखल केला होता. त्या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-5 अन्वये त्यांना तहसीदार भद्रावती यांच्याकडून जून 2019 ला नोटीस मिळाला होता. दरम्यान वानखेडे हे पैशाअभावी सदर शेतजमीन अकृषक करण्यास असमर्थ ठरल्याने व कर्जबाजारी झाल्याने सुधाकर रोहनकर ओळखीचे आहेत म्हणून ले आऊट पडण्यासाठी त्यांना गहाण पत्र करून पैसे मागितले परंतु सुधाकर रोहनकर यानी तुझ्या शेतीवर मी 50 लाख देतो पण तू लिहून दे असे म्हटले व वानखेडे यानी ती शेती विक्री करून दिली. या दरम्यान रोहनकर यांनी शेती रजिस्ट्री करून घेऊन वानखेडे यांना केवळ 22 लाख रुपये नगदी व तीन लाखांचे सहा महिन्यांनंतरचे पोस्ट देटेड चेक दिले पण 25 लाख रुपये मात्र दिले नाही व पैसे मागायला गेले असता तुझ्याच्याने जे होते ते कर ती शेती माझी आहे जास्तं केलास तर जिवनिशी ठार करेन अशी धमकी देत असल्याने पिडीत शेतकरी वानखेडे यानी याबाबत तक्रार दाखल करून दिनांक 22/8/2023 ला पत्रकार परिषदेत मला न्याय मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.यावेळी पिडीत शेतकरी गौतम वानखेडे यांच्यासह मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, गुलाबराव गुलघाने इत्यादींची उपस्थिती होती.
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...