Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विहिरगाव येथे अपघातात...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या युवकाचा कुटूंबियाला विरोधी पक्षनेते,आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मदतीचा हात*

*विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या युवकाचा कुटूंबियाला विरोधी पक्षनेते,आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मदतीचा हात*

*विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या युवकाचा कुटूंबियाला विरोधी पक्षनेते,आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मदतीचा हात*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-२१ ऑगस्ट २०२३सावली तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथील युवक स्व.अजय रमेश कोटंगले हे मागील काही दिवसापूर्वी अपघातात मृत पावले होते आज त्यांचा कुटुंबियांना सावली तालुका काँग्रेस कमीतीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.

*स्व.अजय रमेश कोटंगले हे भूमिहीन शेतमजूर होते.घरात अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंब प्रमुख असल्याने मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कामानिमित्य ते पाथरीला गेले असता घरी परत येताना त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.स्व.अजय रमेश कोटंगले यांच्या पश्चात पत्नी, व दोन लहान मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.परंतु घरातील युवा कर्तृत्वान पुरुष गमावल्याने कोटंगले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले.

सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे यांना या दुख:त घटने बद्दल माहिती प्राप्त होतच त्यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते,आमदार.मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून मृतकाचा कुटुंबाला छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्याकरिता आर्थिक मदत करण्याची विनंती केली.क्षणाचा विलंब न करता मा.आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मा.नितीन गोहणे यांना कोटंगले कुटुंबीयास आर्थिक मदत देण्यासाठी पाठवले.

*प्रत्येक जनसामान्य लोकांना मदत करणे, त्यांचा सुुख- दुःखात सहभागी होणे  हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. तसेच विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांनी "जनसेवा हिच ईश्वर सेवा" याचे व्रत जोपासत प्रत्येकाचा सुख दुःखात सहभागी होतात.आज सदर आर्थिक मदत स्व.अजय रमेश कोटंगले यांच्या पत्नी श्रीमती.सुनीता कोटंगले व कुटुंबियांना देण्यात आली.या वेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार, हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके, युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.पंकज कागदेलवार, विहिरगावचे काँग्रेस कार्यकर्ते मा.नत्थूजि नागोसे,मा.काशिनाथ मोठघरे मा.दिलीप फुलबांधे, मा.कुसुमाकर वाकडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...