आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस - आज दि 20/8/2023 रोजी आई जिजाऊ हेल्पिंग हँड ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी वणी एरिया क्षेत्रीय महाप्रबंधक वेकोली तडाली मार्फत सीएमडी ला निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की ओबी कंपनी व कोल ट्रान्स्पोर्ट कंपनी ड्रायवर, हेल्पर, व अन्य कामगारांचे शोषण करत आहे. कामगारांना हे मालक बरोबर वेतन, व अन्य फॅसिलिटी देण्यात टाळाटाळ करतात गोरगरीब ड्रायव्हर, हेल्पर व अन्य कामगारांचे ते शोषण करतात.
त्यांना योग्य ते मानधन दिले जात नाही.
आम्ही या निवेदनाद्वारे महाप्रबंधक साहेबांना विनंती करतो की आपण या ओबी, कोल ट्रान्सपोर्ट कंपनीवर बरोबर लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही त्या विरोधात सीएमडी मुख्य कार्यालय वेकोली नागपूर येथे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला
मागण्या खालील प्रमाणे
1) भुमीहीन बेरोजगारांना रोजगार लवकरात लवकर देण्यात यावे.
2) नियमानुसार बोनस देण्यात यावे.
3) नियमानुसार मेडिकल देण्यात यावे
4) नियमानुसार मेडिकल लिव देण्यात यावे
5) नियमानुसार महिन्यात GR वेतन देण्यात यावे.
6) नियमानुसार कामगारांना आठ तास काम देण्यात यावे.
7) नियमानुसार सर्व कामगारांना महिन्याला चार सुट्ट्या देण्यात यावे.
8) नियमानुसार सर्व कामगारांना फॅमिली मेडिकल देण्यात यावे.
9) स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे
10) सर्व कामगारांना आय कार्ड देण्यात यावे.
11) सर्व कामगारांना पेमेन्ट स्लिप देण्यात यावे.
12) सर्व कामगारांना पी. एफ स्लिप देण्यात यावे.
वरिल मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला
यावेळेस शरद पाईकराव, जगदीश मारबते, राकेश पारशिवे, अशोक भगत, सुमित फुलकर, आदी उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...