Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / गोवंश तश्करी करणाऱ्यावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

गोवंश तश्करी करणाऱ्यावर चंद्रपूर जिल्हा पोलीसची धडक कारवाई

गोवंश तश्करी करणाऱ्यावर चंद्रपूर जिल्हा पोलीसची धडक कारवाई

सदर कारवाईमध्ये 8 चारचाकी वाहन सोबत 14 आरोपी पोलीसच्या ताब्यात

 

चंद्रपुर: 

पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत मौजा देवई फाटा रोडवर नाकबंदी दरम्यान पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकूण 18 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर वाहन पिकअप क MH34- AK-4148 किंमत 3,00,000/- रुपये आणि 08 नग गोवंशीय जनावरे किमत 80,000/- रुपये असा एकुण 3,80,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 19 ऑगस्ट, 2023 पोलीस स्टेशन पोर्णा हद्दीत मौजा चिंतलधाबा कमारा रोडवर नाकेबंदी दरम्यान दोन बोलेरो वाहन आणि एक टाटा योध्दा वाहन असा एकुण 3 वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 27 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवून जाताना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने बोलेरो वाहन क. MH33-T-3729 किंमत 8,00,000/- रुपये, एक टाटा योध्दा वाहन क MH34-BG-8978 किंमत 8,00,000/- रुपये, बोलेरो वाहन क MH32-AJ-4180 किंमत 5,00,000/- रुपये आणि 27 नग गोवंशीय जनावरे किंमत 2,70,000/- रुपये असा एकूण 26,70,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन गोडपिपरी हद्दीत मौजा विठठलवाडा ते भगाराम तळोधी रोड वर नाकेबंदी दरम्यान बोलेरो मॅक्स वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 10 नग गोदशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाताना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) मधु सानप देवया रा.राजमपेठ जिमंचरीयल, (2) राजन्ना मलया कोटे वय 52 वर्ष (3) अंजी राजन्ना कोटे वय 22 वर्ष दोन्ही रा. केनेपल्ली जि. मचेरीयल. (4) परमेश मलया गोरे वय 34 वर्ष रा. लक्ष्तीपेठ जि. मंचेरीयल (5) रामन्ना नरसया मुत्ते वय 40 वर्ष रा. कॅनेपल्ली जि नवेरीयल आणि (6) राजया राजालिग गोल्ला वय 57 वर्ष रा. ईटक्याल जि. मंचरीयल यांना अटक करून त्याच्या ताब्यातील बोलेरो मॅक्स वाहन क. AP22- Y- 7491 किंमत 3,00,000/- रुपये, बोलेरो पिकअप वाहन क T519-T-3744 किंमत 300,000/- रुपये आणि 10 नग गोवंशीय जनावरे किमत 1,00,000/- रुपये असा एकूण 7,00,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शेगांव चे ठाणेदार सपोनि अविनाश मेश्राम, पोलीस स्टेशन पोंभुर्णा चे ठाणेदार मनोज गदादे, पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरु तसेच पोउपनि महेश सुरजुसे, सफी भिमराव पडोळे, पोहवा मदन येरणे, गणेश मेश्रम पोना निखील कौरासे, संतोष निशाद, पोअ प्रफुल्ल कांबळे पोलीस स्टेशन शेगांव (बु.) पोउपनि श्रीकांत कल्लेपल्लीवार, पोहवा आत्राम पोना राजकुमार चौधरी, पोअ अविनाश झाडे, अरविंद झाडे पोलीस स्टेशन पोंभुर्णा, पोहवा किशोर मांडवगडे, पोअ सचिन पोहनकर, प्रविण कडुकर, हरी नन्नावरे, अमलेश पोलीस स्टेशन कोठारी, पोअ प्रेम चव्हाण, तिरुपती गोडशलवार पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...