आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा औचित्याने, डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम इंनोव्हेटिव्ह विज्ञान प्रयोगशाळा, व इयत्ता 5 वी आणि 8 वी सेमिइंग्रजी वर्गाचे उदघाटन तसेच मेरी मिट्टी , मेरा देश याअंतर्गत शिलालेखा चा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. नारायण जी हिवरकर, उद्घाटक म्हणून सौ. सुरेखाताई नवले सरपंच कन्हाळगाव, प्रमुख अतिथी स्थानी श्री. विनोद नवले उपसरपंच , मुख्याध्यापक स्वतंत्रकुमार शुक्ला, माझी सैनिक श्री. वासेकर, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती चे विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शीलालेखाचे अनावरण सौ सुरेखाताई नवले सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच शासन पुरस्कृत डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम इंनोव्हेटिव्ह विज्ञान प्रयोगशाळा याचे उद्घाटन, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नारायण जी हिवरकर यांचा हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय माझी सैनिक श्री. वासेकर यांचा शाल - श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इयत्ता 5 वी आणि 8 वी सेमिइंग्रजी वर्गाचे रीतसर उदघाटन करून सरपंच - उपसरपंच व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुस्तके प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी , उद्घाटनिय भाषण सौ . सुरेखाताई नवले यांनी, तर अध्यक्षीय भाषण श्री. नारायण जी हिवरकर यांनी केले. त्यात त्यांनी शाळेची विशेष आणि उल्लेखनीय प्रगती बद्दल स्तुती केली, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच देशाच्या प्रगतीचे खरे लक्षण असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रफुल जीवने यांनी तर आभारप्रदर्शन श्री. संजय डोए यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विठ्ठल मडावी , श्री. सुरज जुनघरी, कु . प्रियांका भगत, कु. रोहिणी आडे, कु . अफसाना अली, श्री. संजय मनवर, ताराबाई मेश्राम इत्यादींनी सहकार्य केले.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...