आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
नांदाफाटा:-कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील युवक मित्र परिवाराने आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वतंत्रता दिवस साजरा करण्याचे ठरविले यासाठी युवक मित्र परिवाराने स्वतंत्रता दिनी नांदा येथील जिल्हा परिषद शाळेत आपली उपस्थिती दर्शविली झेंडावंदन व कार्यक्रमानंतर शाळेला दोन सिलिंग फॅन व पाच ट्यूबलाईट देण्यात आले नांदा शहर मित्र परिवाराकडून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोहीद शेख , मुख्याध्यापक के. डी. मेंडुले , नांदागावच्या सरपंच मेघाताई पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी शाळेकरीता भेटवस्तू स्वीकारली सोबतच जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू 100 नग मिल्टन वॉटर बॉटल व कॅडबरी चॉकलेट देण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमात शिवचंद्रजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य व कामगार नेते यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास नांदा शहर मित्र परिवाराचे अभय मुनोत, ग्रामपंचायत सदस्य आशाताई खासरे, व्यँकना रामदेनी,गणेश लोंढे,हारून सिद्दीकी, मारोती बुडे,गौस सिद्दीकी, सतिश जमदाडे , हरिष खंडाळे, शंकर राऊत, नितेश मालेकर,वैशाली मनीष लोंढे, जोत्सना त्रिकारवार, अंजली बंडीवार, छाया धारवटकर, संगीता निमगोट, माधुरी जिवतोडे , भाग्यश्री कपले, रतन ठाकरे, संतोष मडावी यांचे सह मोठ्या संख्येने मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते स्वातंत्र्यदिनी नांदा शहर युवक मित्र परिवारांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला भेटवस्तू व विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू देण्याच्या स्तुत्य उपक्रमाचे नांदा ग्रामवासियांनी कौतुक केले आहेत जिल्हा परिषद शाळेला व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन युवक मित्र परिवारांने मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिवस साजरा केला
*नांदा शहर मित्र* परिवाराकडून अपघातग्रस्तांना मदत केली जाते सामाजिक उपक्रमातही मोठ्या हिरेरीने भाग घेतला जातो महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद शाळेत दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे आवश्यक सोयीसुविधा शासन शाळेला पुरवीत नाही नांदा येथील शाळेत आज घडीला 100 विद्यार्थी शिकत आहे नांदा शहर मित्र परिवारातील सदस्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे स्वातंत्र्यदिनी आपल्या शाळेला आगळीवेगळी भेट म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला संजय बुरघाटे, पुरुषोत्तम निब्रड, सचिन बोढाले, महेश राऊत, मनिष लोंढे,रामकृष्ण रोगे यांनी यशस्वीरित्या उपक्रम राबविल
*मित्र परिवाराचे मदतीने रंगमंच उभा करून देणार*
स्वातंत्र्यदिनी आगळावेगळा उपक्रम मित्रांच्या सहकार्यानेच शक्य झाला अनेक वर्षापासून शाळेकडून रंगमंच बनवून देण्याची मागणी होत आहे निधी अभावी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असावे 26 जानेवारी पूर्वी आम्ही मित्र परिवाराकडून जिल्हा परिषद शाळेला रंगमंच तयार करून देऊ
अभय मुनोत
सदस्य नांदा शहर मित्रपरिवार
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...