Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *नगर परिशद राजुराच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*नगर परिशद राजुराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार*

*नगर परिशद राजुराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*    *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार*

*नगर परिषद राजुराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-नगर परिषद राजुरा च्या वतीने आयोजित आझादी का अमृत महोत्सव सांगता कार्यक्रम अंतर्गत माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत देशाच्या मातीला नमन, विरांना वंदन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभ दि. १४ ऑगस्ट  रोजी न. प. कार्यालय परिसर, भारत चौक पार्क, डॉ. झाकीर हुसैन शाळा गढी वार्ड, राजुरा येथे संपन्न झाला. या प्रसंगी श्रीमती सुनंदा माळवनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण, माजी सैनिक गुरूदास पोकलवार यांच्या हस्ते वृक्षारोपण, माजी सैनिक शंकर मेगरे यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सर्व माजी सैनिकांचे सत्कार करण्यात आले.

     या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित, माजी सैनिक श्री. दयाराम माळवनकर (मय्यत), यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा दयाराम माळवनकर,

महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त व इंडोपाक वार १९७१ मध्ये सहभाग माजी सैनिक श्री. भाऊराव के. भोयर, माजी सैनिक बेस्ट कॅडेट पुरस्कार प्राप्त श्री. गुरुदास पोकलवार, राष्ट्रपती पुरस्कार शौर्यपदक सन्मानित माजी सैनिक श्री. शंकर गणपती मेंगरे आदि मान्यवरांचा आ. धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

        या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, माजी नगरसेविका उज्वला जयपूरकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, जगताप मॅडम, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न प राजुरा चे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुरज जाधव यांनी केले. सुत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी विजयकुमार जांभुळकर यांनी केले तर केंद्र प्रमुख बंडू ताजने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत अभियंता आदित्य खापणे, पाणी पुरवठा अभियंता सुमेध खापर्डे, लिपिक संजय जोशी, करनिरिक्षक उपेंद्र धामणगे, सुरेखा पटेल, प्रांजली सरपटवार, अभियंता प्रीतम खडसे इत्यादींचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...