आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
गट ग्रामपंचायत जळकाच्या
सरपंच निता बोढाले पायउतार
आठ विरुद्ध एक मतांनी अविश्वास पारित
बातमीदार : वरोरा तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर
वरोरा : तालुक्यातील जळका येथील गट ग्रामपंचायत च्या सरपंच नीता प्रसाद बोढाले या मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा होता. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे, परस्पर निधीचा उपयोग करणे, मर्जीतील लोकांना कामे देणे, अतिक्रमण करणाऱ्या लोकांना सहकार्य करणे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सुचवलेली कामे हेतू पुरस्कृत टाळणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
या बाबत तहसीलदार योगेश बाळासाहेब कौटकर यांनी शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी जळका गट ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेला संपूर्ण नऊ सदस्य उपस्थित होते. यादरम्यान पुरुषोत्तम विठ्ठल उइके यांनी सभेपुढे अविश्वास प्रस्तावा बाबत विषय मांडला. या विषयाला गणेश नानाजी गराटे यांनी अनुमोदन दिले. यानंतर सरपंच नीता प्रशांत बोढाले यांनी आपले मत मांडताना आरोपा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी केली. दरम्यान यावर एकमत न झाल्याने अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. तेव्हा उपसरपंच प्रफुल महादेव आसुटकर,सदस्य छबूताई भीमराव झाडे, सरिता सूर्यभान सातपुते, कुमुद शरद मडावी, मयूर सूर्यभान वाळके, गणेश नानाजी गराटे, पुरुषोत्तम विठ्ठल उइके, रूपाली अतुल भालशंकर यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. तर सरपंच निता प्रशांत बोढाले यांनी अविश्वास प्रस्तावाच्या विरुद्ध मतदान केले. अशा रीतीने आठ विरुद्ध एक मतांच्या फरकाने सरपंच नीता प्रशांत बोढाले यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याचे तहसीलदार योगेश बाळासाहेब कौटकर यांनी जाहीर केले. दरम्यान या ग्रामपंचायतचा प्रभार उपसरपंच प्रफुल महादेव आसुटकर यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी ग्रामसेवक दिनेश साव उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...