Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चन्द्रपुर शेतकऱ्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चन्द्रपुर शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा ना नितिन गडकरी महासंघाच्या शेतकरी मेळाव्यास येणार*

*चन्द्रपुर शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा ना नितिन गडकरी महासंघाच्या शेतकरी मेळाव्यास येणार*

*चन्द्रपुर शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा ना नितिन गडकरी महासंघाच्या शेतकरी मेळाव्यास येणार*  

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-नुकतेच वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे सर्व संचालक मा ना नितीनजी गडकरी केंद्रिय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग परिवहन मंत्री नवी दिल्ली यांच्याशी चर्चा झाली.शेतकरी उत्पादक महासंघाच्या संचालकांनी या महासंघाला 52 शेतकरी उत्पादक कंपनी व 41 हजार शेतकरी कुटुंब जोडल्या गेलेले असल्याचे  मंत्री महोदयांना सांगितले. त्यांनी मानस ऍग्रो उद्योग समूहाच्या प्रयत्नाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी उसाचे क्षेत्र वाढवलेले आहे. परंतु WCL च्या कोळसा उत्खणामुळे,जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे, उसाचे क्षेत्र वाढीवर परिणाम होत असून जिल्ह्यातील तापमान मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.  सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टिकोनातून  गडकरी साहेबांनी लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातून वरोरा, कोरपना भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर,राजुरा या तालुक्या मधून वर्धा नदीचा बारमाही प्रवाह आहे. तसेच चिमूर, नागभिड, ब्रह्मपुरी, सिंदेवांही, मुल, पोम्बुर्णा, गोंडपिप्री तालुक्यातून वैनगंगा या नदीचा बारमाही प्रवाह आहे. त्यामुळे ह्या नदीवरून सर्व तालुक्यांना उपसा सिंचन व्यवस्था करण्याबाबत गडकरी साहेबांनी लक्ष घालावे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये सिंचाई चे क्षेत्र वाढण्यास मदत होईल त्यामुळे ऊस लागवड व नेपियर ग्रास लागवडीचे क्षेत्र मोठ्या संख्येने वाढू शकते त्यामुळे भविष्यामध्ये इथेनॉल व बायोडिझेल उद्योगांमध्ये वाढ होऊ शकते. आदी बाबी मा. मंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिल्या त्याच वेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कापूस  हरभरा व बांबु व धानावर आधारित उद्योग उभे करावे असेही मा. मंत्री महोदयाना विनंती करण्यात आली.  आजपर्यंत गडकरी साहेब केवळ  राजकीय दृष्टिकोनातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत होते व आलेले आहेत. सदर संचालकांनी त्यांना विनंती केली की यापुढे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याकरिता शेतकरी मेळाव्यास त्यांनी उपस्थित राहावे व बायो मास भविष्याची गरज शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती केली. त्या विनंती अनुसरून त्यांनी आपण शेती उद्योग क्षेत्रामध्ये  असलेले काम कामे वाढीस लावावे. मी नक्की तुमच्या शेतकरी मेळाव्यास येईल हा माझा शब्द आहे. अशा भाषेत त्यांनी सर्व संचालकांचा उत्साह वाढविला व दिलेल्या निवेदनाची योग्य दखल घेत संबधिताना सुचना केल्या चन्द्रपूर शेतकरी मेळाव्यास येण्याची  मान्य केले.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...