Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *माझा सारख्या सामान्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळणे हे सामान्य कार्यकर्त्याचा कष्टाचा सन्मान --मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा म.रा* *सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ वडेट्टीवार मित्रपरिवारातर्फे भव्य नागरी सत्काराचे आयोजन*

*माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळणे हे सामान्य कार्यकर्त्याचा कष्टाचा सन्मान --मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा म.रा*    *सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ वडेट्टीवार मित्रपरिवारातर्फे भव्य नागरी सत्काराचे आयोजन*

*माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळणे हे सामान्य कार्यकर्त्याचा कष्टाचा सन्मान --मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा म.रा*

 

सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ वडेट्टीवार मित्रपरिवारातर्फे भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक१२ ऑगस्ट २०२३ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची नुकतीच दुसऱ्यांदा राज्याचा विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाली.त्यामुळे महाराष्ट्रासह त्यांचा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गडचिरोली- चंद्रपूर सारख्या अति दुर्गम भागातील जनतेचे प्रतिनिधित्व मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार हे मागील २० वर्षा पासून करीत आहेत.राजकारणातील दांडगा अनुभव,जनतेच्या समस्येची जाण,अभ्यासू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे, तसेच प्रत्येक घटकातील लोकांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व,विरोधकांना घेरून सामान्य जनतेच्या प्रश्नाना न्याय मिळवून देणारे लोकनेते,अशी त्यांची ओळख आहे.या सर्व बाबीमुळे त्यांना चाहणारा मोठा वर्ग आहे.काँग्रेस पक्षाची बीजे रोवण्यात आमदार.विजय वडेट्टीवार यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे पक्षश्रेष्टींनी पुन्हा एकदा त्यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली.आज ते विरोधीपक्षनेते झाल्यानंतर प्रथमच आपल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यात भेट देणार होते.त्यांचा प्रथम आगमना प्रित्यर्थ सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ मित्रपरीवारतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार मा.निखिल सुरमवार व्याहाड खुर्द यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार, नागपूर शिक्षक विधानपरिषद आमदार श्री.सुधाकर अडबाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व गडचिरोली- चिमूर लोकसभा समन्वयक मा.नामदेव किरसाण, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प. मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 आज या भव्य दिव्य नागरी सत्कार समारोहास व विरोधी पक्षनेते आम.श्री.विजयभाऊ यांचा सत्कार करण्यासाठी चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ मित्रपरिवारातील कार्यकर्त्यांनी राजेशाही थाटात त्यांचे स्वागत केले.विरोधी पक्षनेते आम.विजयभाऊ वडेट्टीवार यांची तमाम कार्यकर्त्यांचे आभार मानले.

  माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळणे हे सामान्य कार्यकर्त्याचा कष्टाचा सन्मान आहे,राज्यातील सरकार हे जनता विरोधी,येत्या काळात काँग्रेस सत्तेवर येणार असून ही जनतेची मागणी आहे,सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे इडीच्या भीतीने सत्तेत सामील, मी सर्व समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेत राहील, माझा लढा ओ.बी.सी च्या न्याय व हक्कासाठी निरंतर असणार आहे, लवकरच राज्यभरात दौरा काढून ओ.बी.सी समाजाच्या समस्या समजून घेण्यात येईल, स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अधिकतम परीक्षा फी घेऊन हे सरकार विद्यार्थ्यांची तसेच दिवसानुदिवस होणारी भाववाढ यामुळे सामान्य जनता शेतकरी यांची लुट होत आहे.येत्या निवडणुकीत जनताच यांना धडा शिकवेल, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासून कंभर कसून कामला लागा असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते, आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सत्कार समारोहात केले.

या सत्कार समारंभाला सावलीचे माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाऊ सिद्धाम,माजी प.स.सभापती मा.विजय कोरेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.हिवराज पाटील शेरकी, न.पं.सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लता लाकडे, उपनगरध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,सावली शहर अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तीवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल सुरमवार, व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे, उपसरपंच सौ.भावना बीके, मा.अनिल म्हशाखेत्री, मा.अनिल गुरुनुले, मा.दीपक जवादे,मा.सुनील बोमनवार,मा.आशिष मंबतुलवार, मा.संजय मजोके, तसेच सावली तालुका  शहर व ग्रामीण काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी,सावली नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक- नगरसेविका व कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...