आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भदावती:-हिन्दुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी सुसंगत ब्रिदवाक्य “८०% समाजकारण व २०% राजकारण” मुलमंत्र अंगीकृत करीत शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, पूर्व विदर्भ महीला सघंटीका तथा प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे, युवासेना पूर्व विदर्भ सचीव निलेश बेलखेडे तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे व उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या मार्गदर्शनात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील गावागावात शिवसेना (उबाठा) पदाधिकारी हे गावखेडयातील जनतेचे प्रश्न समस्या सोडविण्याकरीता जनतेच्या दारी पोहचण्याचा विडा उचलला आहे.
याचाच एक भाग तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात शहरप्रमुख घनश्याम आस्वले तसेच युवासेना अधिकारी राहुल मालेकर हे भद्रावती तालुक्यातील चिंचोली या गावात आढावा बैठक आयोजन करीत चिंचोली ग्रामस्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत पाठपुराव करीत निरासरण करण्याचे पुरजोर प्रयत्न करुन सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी गावकऱ्यांनी दोन प्रमुख समस्या उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांच्यापुढे यांच्यापुढे मांडल्या. वनविभागाकडून वन्यप्राण्यापासून गावकऱ्यांच्या संरक्षणाकरीता गावाला जाळीच्या कुंपणाचे काम अर्धवट केले असून अजूनही पुर्ण झालेले नाही ते तात्काळ मार्गी लावण्याचा मुद्दा उपसरपंच महेश सागोरे यांनी गावकऱ्यासह हा मुद्दा मांडला. लगेचच तालुका प्रमुख नंदू पढाल यांनी सक्षम अधिकारी बोंढे यांच्याशी संपर्क करुन अर्धवट कामाबद्दल माहिती घेतली व पाठपुरावा करुन अर्धवट झालेले काम पुर्ण करुन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
चिंचोली गाव हे जंगलाला लागून असल्याने वाघाची भिती असून येथील विद्यार्थ्याना दोन किलोमीटर चोरा येथे शाळेत जावे लागते. परीवहनाची सोय नसून 10 वर्षापासून बस सेवा बंद असून गावकरी व विद्यार्थ्यांनकरीता बस सेवा सुरु करुन देण्याची मागणी केली. यावर शहर प्रमुख आस्वले यांनी गावातील बस सेवा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्वरित लवकरात लवकर चालू करून देवू असे सांगीतले.
या आढावा बैठकिला तालुकाप्रमुख तथा नगरसेवक न. प भद्रावती नंदू पढाल, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, चोरा ग्रा.प. उपसरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख विलास जीवतोडे, ग्रा.प. उपसरपंच महेश सागोरे, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा.प. माजी सरपंच तथा सदस्य मनोहर श्रीरामे, सदस्य शेखर इखारे, जेष्ठ शिवसैनिक सखाराम श्रीरामे, नथु रंदये, विजय जांभुळे, सुरेश जांभुळे, दशरथ चौधरी, विनोद साव, गणपत इखारे व गावकरी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...