Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सुदृढ आरोग्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक - आमदार सुभाष धोटे* *राजुरा येथे तालुक्यातील स्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन*

*सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक - आमदार सुभाष धोटे*    *राजुरा येथे तालुक्यातील स्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन*

*सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक - आमदार सुभाष धोटे*

 

*राजुरा येथे तालुक्यातील स्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-संतुलित आणि सकस आहारामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. स्थानिक परिसरातील, जंगल, शेतशिवारातील आढळून येणाऱ्या विविध आरोग्यदायी रानभाज्या, रानफळे यांची माहिती व उपयुक्तता नागरिकांना होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनी आणि महोत्सवाच्या आयोजनामुळे नागरिकांना रानभाज्यांची ओळख होते, त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होते. या महोत्सवाला तालुक्यातील नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. ते तहसील कार्यालय राजुरा येथील सभागृहात तालुका कृषी विभागा द्वारा सकाळी ११ वाजता आयोजित तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

        या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसिलदार ओमप्रकाश गौड, उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी रवींद्र चव्हान, राजुरा काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरीवार, व्यवस्थापक अंबुजा सिमेंट फॉउनडेशन चे श्रीकांत कुंभारे, कृषी विद्यापीठातील ज्योती ढोंगळे, शेतकरी मारोती लोहे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

         या रानभाजी महोत्सवात रागिणी स्वयं. सहाय्यता समूह वरूर रोड, निसर्ग शेतकरी महिला गट पंचाळा, भाग्यविधाता महिला ग्राम संघ पंचाळा, जय दुर्गा महिला बचत गट, अंबुजा फाऊंडेशन उपरवाही व तालुक्यातील इतर सहभागी महिला व शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होऊन करटोली / काटवल, टाकळा /तरोटा, शेवगा, अळू, धोपा, केना, बांबू, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर, गुळवेल, कडुभाजी यासह विविध आरोग्यदायी रानभाज्या या महोत्सवात प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यावेळी सर्व सहभागी बचत गटांना आ. धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात राजुरा तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...