आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गाडेगाव:-वेकोली कोलगाव येथे अनेक समस्या प्रलंबित आहे. वेकोली कोलगाव उपक्षेत्र प्रबंधक अनेक वर्षापासून उडवा उडवी चे उत्तर व दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचे माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे.आणि प्रकल्पग्रस्त राजेंद्र ढवस. यांनी वेकोली जन माहिती अधिकार ताडाळी चद्रपुर येथे अर्ज सादर केला होता. परंतु तीस दिवसाचा कालावधी संपल्यानंतर ही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. जन माहिती अधिकारी या कायद्यानुसार माहिती मिळवणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यास अलगर्जीपणा करत आहे. अपिलीय अधिकारीकडे तक्रारीत मोठा भर सार्वजनिक माहिती अधिकार आणि प्रथम अपिलीय प्राधिकारी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे पालन करत नाहीत. आणि अगदी बेकायदा बांधकाम असो किंवा एखादा करार किंवा भ्रष्टाचार इत्यादी वरील माहिती अगदी स्पष्टपणे नाकारतात हे देखील लक्षात आले आहे सार्वजनिक माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय प्राधिकारी देखील भ्रष्टाचाराची माहिती शोधणाऱ्या आर टी आय अर्जदारांना तीस दिवसाच्या आत माहिती दिली जात नाही. माहिती अधिकार कार्यालयाकडून संबंधित माहिती ३० दिवसाच्या आत अर्जदाराला मिळणे अपेक्षित असूनही ती वेळेवर मिळत नसल्याची शोकांतिका असल्याची ही प्रतिक्रिया देत जर माहिती अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले पाहिजे. सार्वजनिक हिताची माहिती सहज व सोप्या पद्धतीने मिळावी ह्या माहिती अधिकार कायद्याचा उद्देश जरी असला तरी त्याची कमीत कमी वेळा गरज पडावी. आणि संबंधित विभागाची माहिती सामान्य माणसांना मिळावी हे जन माहिती अधिकार सर्व विभागांना बंधनकारक आहे शासकीय कार्यालयातील जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ पुरेसे प्रशिक्षण देण्याची अत्यंत गरज असल्याचे अर्जदाराकडून बोलल्या जात आहे
माझी शेती १९९१ मध्ये संपादित झाले होते जेव्हा आमची शेती कोलगाव वेकोली मध्ये अधिग्रहण झाले तेव्हा माझ्या वडिलाला फक्त मोबदला दिले परंतु नोकरी स्थान अजून मिळाले नाही. अनेकदा वेकोलीला जाब विचारण्यात आला परंतु कोलगाव वेकोली ने कारणे देत आम्हाला टोलवाटोलवी करत होती याच संदर्भातली माहिती वेकोली कार्यालय ताडाळी अर्ज सादर केले होते. माहिती वेळेवर देण्यात आली नाही दिलेली माहिती चुकीची आहे. आणि जी माहिती मागितली ती माहिती न देता आमच्याकडे माहिती उपलब्ध नसल्याची पत्र मला देण्यात आले
प्रकल्पग्रस्त शेतकरी :-राजेंद्र ढवस कोलगाव
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...