संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
भद्रावती : ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील कु. नीलिमा सुधाकर चव्हाण वय २४ वर्षे हि दापोली येथील स्टेट बँक येथे कंत्राटी कामावर नौकरीवर होत्या दि. २९/७/२०२३ रोजी कामावरुन परत येत असताना तिचे अपहरण करून तिच्यांवर अत्याचार करून डोक्यावरील केस काढून चेहरा विदृप करून खुन करण्यात आला. तिचा मृतदेह दाभोळ खाईमध्ये दि. ०१/०८/२०२३ ला आढळून आला नाभिक समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील ह्या मुलीचा खून करणाऱ्या नराधमाला अटक करून कठोरातील कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा नाभिक समाज संघटना रस्त्यावर उतरले व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पालकमंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार व आ. प्रतिभाताई धानोरकर यांना प्रतिलिपी पाठविण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित भद्रावती नाभिक समाजाचे अध्यक्ष बंडू व्ही लांडगे, नाभिक सलुन दुकानदार असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन नक्षिणे, नाभिक युवा शक्ती चंद्रपूर जिल्हा सदस्य राजेश येसेकर,नाभिक महिला संघटनेच्या सचिव सौ. वर्षाताई वाटेकर, अखंड नाभिक महिला विदर्भ प्रांताध्यक्ष्या ज्योतीताई लांडगे, शोभाताई लांडगे, सविता लांडगे, नंदनी लांडगे, वैशाली दळवी, मधुकर वाटेकर, हनुमान नक्षिणे, सागर घुमे, सतिश मांडवकर, सुधीर लांडगे, पियुष घुमे, छत्रपती दैवलकर,सतिश जांभुळकर,अंकुश दर्वे,विजय मेश्राम, गणेश दैवलकर इत्यादी होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...