आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : वरोरा प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
वरोरा : पोलीस स्टेशनमध्ये एका आदिवासी महिलेला पोलीस स्टेशन परिसरातच तीन तीन आयपीएस पोलीस अधिकारी यांच्या देखत विष पिण्याची वेळ आली असतांना दुसरीकडे पुन्हा यांचं पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेला तिच्या डोळ्यादेखत तिच्या मुलाला व दीर यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याने तिने पोलीस परिसरातील बाथरूम मधे जाऊन विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मात्र त्यांवर सांत्वना देण्याचे सोडून चक्क पोलीस प्रशासनाकडून त्यां महिलेने विष पिल्याचा बनाव केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे जर त्यां महिलेने विष पिल्याचा बनाव केला असता तर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिला चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कां रेफर केले ? यांचे उत्तर मग पोलीस देणार आहे कां ? विशेष बाब म्हणजे पोलिसांना फिर्याद देणाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार आहे कां ? हे सुद्धा पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले पाहीजे आणि ही बाब जर न्यायालयात न्यायाधीशांसमोर आली तर मग पोलीस काय उत्तर देणार ? हे पण स्पष्ट करावे. एखाद्या लाचार कमजोर लोकांवर अन्याय झाला असतांना त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पोलिसांनी करायची असते पण इथे तर सगळी उलटी गंगा वाहत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आणि हे लोकशाहीला घातक आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील रहिवासी अर्चना दिवाकर दिवटे वय ४८ वर्ष यांनी वरोरा पोलीस स्टेशन मधे त्यांच्या शेतीच्या वादाच्या संदर्भात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यान आरोपी चाफ़ले यांनी महिलेच्या शेतात अतिक्रमण केलेल्या जागेवर पोल गाढले व जबरदस्ती कुंपण घातले त्यामुळं महिलेच्या शेतातील पिकांना तुडवले गेले व काही पिकांचे नुकसान झाले. पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी अतिक्रमण व झालेले अतिक्रमण तोडण्यास मनाई असतांना केवळ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण बेकायदेशीरपणे तोडले गेल्याचे प्रसंग वरोरा शहरात नुकतेच बघावयास मिळाले असताना आरोपी चाफले यानी सुद्धा पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण केल्याचा दावा महिलेच्या पतीने केला आहे व विष प्राशन केल्यानंतर व महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर तिच्या मुलाला व दीर याला पोलीस स्टेशन मधे बोलावून त्यांच्याकडून चुकीचे बयान लिहून घेण्याचा पोलिसांचा हेतू तर नाही ना अशी शंका निर्माण होतं आहे. त्यामुळं महिलेचा परिवार पोलिसांच्या दहशतीत असल्याने व पोलिसांना फिर्यादीना मारण्याचा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी बंद खोलीत दोघांना बेदम मारहाण केल्याने या प्रकरणी आता मोठा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान विष पिणाऱ्या त्यां महिलेची प्रतिक्रिया घेण्यात आली असल्याने या प्रकरणी पुढे काय काय होणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...