आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :-भारतीय जनता पक्षात गेल्या ३५ वर्षांपासून विविध पदांवर काम करीत असलेले नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोरपना तालुकाध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. हिवरकर यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्यांसोबतच कन्हाळगावचे सरपंच, उपसरपंच व तीन वेळा सदस्यपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, तालुक्यातील जवळपास दोन ते अडीच हजार उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ, दोन ते अडीच हजार नागरिकांना निराधार योजनेचा लाभ तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
भाजपात शाखा अध्यक्ष पदापासून सुरुवात झाल्यापासून तालुका उपाध्यक्ष,भाजयुमोचे चार वेळा तालुकाध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. त्यानंतर भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करीत असून, त्यासोबतच जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटनेतील कामासोबतच गरजवंत नागरिकांची कामे त्यांच्याकडून केली जात असून, या कार्याची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या शिफारशीने नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपासोबतच नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...