Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *इतरांच्याही बातम्या,पण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*इतरांच्याही बातम्या,पण २ दलित,१मुस्लिम पत्रकारालाच३कोटींची नोटीस* *येथेही जातीयवाद.(आश्चर्य)* *(यशोधन विहार टॅक्स प्रकरण)*

*इतरांच्याही बातम्या,पण २ दलित,१मुस्लिम पत्रकारालाच३कोटींची नोटीस*    *येथेही जातीयवाद.(आश्चर्य)*  *(यशोधन विहार टॅक्स प्रकरण)*

*इतरांच्याही बातम्या,पण २ दलित,१मुस्लिम पत्रकारालाच३कोटींची नोटीस*

 

*येथेही जातीयवाद.(आश्चर्य)*

*(यशोधन विहार टॅक्स प्रकरण)*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

  नांदाफाटा :-कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी,नांदा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या पी.एम.इन्फ्रावेंचर कंपनीच्या 'यशोधन विहार' कॉलनीला टॅक्स लागू करावा,अशी मागणी नांदा येथील सामाजिक कार्यकर्ते 'मारोती बुडे' यांनी 'कोरपना पंचायत समिती गटविकास अधिकारी' यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.'ज्याप्रमाणे महसूल विभाग' यांच्याकडून टॅक्स घेत आहे,त्याचप्रमाणे नांदा ग्रामपंचायतीने सुद्धा यांच्याकडून टॅक्स घ्यावा,जेणेकरून त्या रकमेने गावाचा विकास करता येईल' अशा उदात्त हेतूने बुडे यांनी सदर मागणी केली.दरम्यान बुडे यांच्या निवेदनाच्या आधारे पत्रकारांनी आपपाल्या परीने बातम्या न्यूज़ पोर्टलवर प्रकाशित केल्या.यापुर्वी सुद्धा अनेक वृत्तपत्रातून 'यशोधन विहार' च्या बाबतीत बातम्या प्रकाशित झाल्या.सविस्तर लेखाजोखा याद्वारे मांडण्यात आला.त्यातील काहींची तोंडी स्वरूपाने मुस्कटदाबीचा प्रयत्न झाला.पण आता 3 पोर्टलच्या पत्रकारांना थेट 3 कोटी नुकसान भरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे.  नांदा व परिसरातील दोन पत्रकार आणि गडचांदूर येथील एका पक्षाचा संधीसाधू, स्वयंघोषित,जातीयवादी नेत्याच्या संगनमताने टार्गेट करून सुडबुद्धीने 2 दलित आणि 1 मुस्लिम समाजातील पोर्टलच्या पत्रकारांना 'यशोधन विहिर'ची मर्जी नसताना 'आम्ही पाहून घेतो,तुम्हाला काहिच करायची गरज नाही' असे सांगून नोटीस पाठवण्यासाठी राजी केले,इतकेच नाही तर ते 2 पत्रकार वकीलाकडे सोबतही गेले.अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.'बातमी प्रकाशित केल्यामुळे कंपनीचा नुकसान झाला' असा ठपका ठेऊन या 3 दलित, मुस्लिम पत्रकारांना नोटीस पाठवण्यात आली,हे मात्र विशेष.

      *सुज्ज्ञ नागरिकांचे परखड मत*

देशात ठिकठिकाणी काही निवडक जाती-धर्माच्या लोकांना टार्गेट करून संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर या दलित-मुस्लिम पत्रकाराला टार्गेट करून संपवण्याचा कट आखला गेला आहे.विविध प्रकरण निदर्शनास येत असताना,आपल्या जिल्ह्यात सर्व जाती-धर्माचे बांधव अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहे.जातीभेद याठिकाणी नसताना,ही मंडळी कट-कारस्थान रचून विनाकारण यांना गोवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शांतता भंग करण्याचा प्रयत्न यांचा दिसतो.त्या राजकिय नेत्याला आम्ही येत्या काळात त्याची जागा दाखवूच,पण त्या पत्रकारांनी असे वागणे अतिशय चुकीचे आहे.अशा प्रकारे मुस्कटदाबीच्या विरोधात इतर पत्रकारांनी अशावेळी पुढे येण्याची गरज आहे.असे परखड व निषेधार्थ मत काही सुज्ज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...