Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *यशोधन विहार कॉलनीला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*यशोधन विहार कॉलनीला नांदा ग्राम पंचायत टॅक्स का लावत नसेल.?* *नेमक्याच पत्रकारांना नोटीस देऊन खरा भ्रष्टाचार लपवण्याचा डाव*

*यशोधन विहार कॉलनीला नांदा ग्राम पंचायत टॅक्स का लावत नसेल.?*    *नेमक्याच पत्रकारांना नोटीस देऊन खरा भ्रष्टाचार  लपवण्याचा डाव*

*यशोधन विहार कॉलनीला नांदा ग्राम पंचायत टॅक्स का लावत नसेल.?*

 

*नेमक्याच पत्रकारांना नोटीस देऊन खरा भ्रष्टाचार  लपवण्याचा डाव*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नांदा फाटा :-येथील यशोधन विहार  पि.एम.इंफ्रावेंचर पोर्णिमा श्नीवास्तव  हे कंत्राटदार बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकअसल्याने होणार भ्रष्टाचार  लपविण्यासाठी बातम्या न विचाररता टाकल्या म्हणून

पत्रकारांची प्रतिमा खराब केली*

*साप्ताहिक विदर्भाचा वीर-कार्यालय संपादिका

शिला धोटे*

यशोधन विहार काँलनीला नांदा  ग्रामपंचायत टँक्स का

लावत नाही.अशी तक्रार  कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

सामाजिक कार्यकर्ता-मारोती बुडे नांदा

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील मौजा नांदा येथे पी.एम.इन्फ्रावेंचर कंपनीच्या यशोधन विहार आवास प्रकल्पाचे काम 2019 पासून सुरू आहेत.या आवास प्रकल्पाला नांदा ग्राम पंचायतने 29 नोव्हेंबर 2019 रोजी NOC ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहेत.सदर प्रकल्पाला लागणारी जमीन कोरपना तहसीलचे तत्कालीन तहसीलदार यांच्या आदेशानुसार प्रकल्प धारकाने स्वतः अकृषक केलेली आहेत.जमीन अकृषक करण्यात आल्याने महसूल विभागा कडून सन 2019-20 पासून अकृषक कर आकारला जात आहे.मात्र नांदा ग्राम पंचायतने कुठलाही गृहकर आकारलेला दिसत नाही.ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तातडीने याकडे लक्ष देऊन पी.एम. इन्फ्रावेंचर,या बिल्डर कंपनीकडून नांदा ग्राम पंचायतीने 2019-20 पासून कर वसूल करावा, यासाठी उचित कारवाई करावी,अशी मागणी वजा विनंती नांदा येथील मारोती दत्तुजी बुडे यांनी कोरपना पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 प्रकल्पासाठी लागणारी जमीन अकृषक केल्यानंतर एका वर्षाच्या आत जमीन धारकाने याबाबत नांदा ग्राम पंचायतला माहिती देणे, तशी नोंद करणे व योग्य त्या कराचा भरणा करणे गरजेचे होते.परंतू,नांदा ग्राम पंचायतला याबाबत जमीन धारकाने कुठलीही सूचना दिली नाही.मागील 4 वर्षाचा नांदा ग्राम पंचायतने गृहकर आकारला नसल्याने ग्राम पंचायतचे जवळपास एक करोड रुपयांच्यावर नुकसान झाले आहेत.वेळेत कर आकारले असते तर त्या पैशातून गावाचा विकास साधता आला असता.नांदा ग्राम पंचायतच्या काही सदस्यांची प्रकल्प मालकासोबत जवळीक असल्याने कर आकारला जात नाही. सलोख्यामूळे ग्राम पंचायतचे करोडोचे नुकसान झाल्याचा आरोप मारोती बुडे यांनी तक्रारीत केला आहे.कर न आकारणे,ही बाब गंभीर असल्याचे उल्लेख करत,तातडीने कर वसूली करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ता मारोती बुडे यांनी केली आहे. आता प्रशासन बुडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन सदर यशोधन विहारवर टॅक्स लावणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पंचायत समितीला तक्रार प्राप्त झाली आहे. नांदा ग्रामपंचायतीला यशोधन विहार प्रकल्प धारकांकडून कर आकारणी करावी अशी लेखी सूचना दिली आहे

*विजय पेंदाम*

गटविकास अधिकारी,

पं. स. कोरपना

यशोधन विहार प्रकरणी बातम्या प्रकाशित केल्या म्हणून

पत्रकारांना तीन करोडच्या (जुर्मानाचा ) वसुलीचा वकिलाच्या

नोटिसातून मागणी  केल्याने  तालुक्यातील जिल्ह्यात  एकच चर्चेचा

विषय असला तरी  निर्भीड  पत्रकारांना लिखाणात  बादा  आणून

खऱ्याखुऱ्या पत्रकारांची  गोच्ची  होण्याची भीती

शिला धोटे. यांनी  एका समविचार  सभेत  करून  निषेध केला आहे

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...