आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-राजुरा तालुक्यातील आर्वी गावा नजदिक असलेल्या दर्ग्याजवळ काल रात्री 8 वाजता कार व ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली असून एका महिलेला किरकोळ मार लागला आहे झालेल्या भीषण अपघातात कारचे इंजन व समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला दैव बलवत्तर असल्याने वेळीच कार मधील एअरबॅग खुलल्याने कार मधील दोघांचाही जीव वाचला
सविस्तर वृत्त असे की, नांदा फाटा येथील सुमेंद्र ठाकूर यांचा अनेक वर्षापासून प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्याचेकडे होंडा कंपनीची औरा मॉडेल ही गाडी आहे गाडीचा वाहन क्रमांक एम. एच. 34 बी. आर. 9768 आहे मिळालेल्या माहीती नुसार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास नांदाफाटा येथील तिरुपती शंकर भीमेकर हा सु्मेंद्र ठाकूर यांची गाडी घेऊन काही कामानिमित्त चंद्रपूर येथे जात होता आर्वी गावा नजदीक असलेल्या दर्ग्यासमोर राजुराकडून येणाऱ्या ट्रक व कार मध्ये जोरदार टक्कर झाली भयंकर अपघातामध्ये कारचे इंजन व समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला सुदैवाने वेळीच एअर बॅग खुलल्याने जीवित हानी झाली नाही अपघातात चालक तिरुपती शंकर भिमेकर, नांदाफाटा याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे डोळ्याला जबर मार लागला सध्या त्याचेवर नागपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत चालक तिरुपती भिमेकर याची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आहेत गाडीमध्ये असलेल्या महिलेला किरकोळ दुखापत झाली असून राजुरा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचारा नंतर तिला सुट्टी देण्यात आली आहे अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला अपघाता प्रकरणी राजुरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे
राजुरा ते कोरपना हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला असल्याने महामार्ग बनविण्याचे काम जोरात सुरू आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघात टाळण्यासाठी वाहने वेगाने चालवू नये दैव बलवत्तर असल्याने वेळीच कारमधील एअरबॅग खुलल्यामुळे प्राण वाचले
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...