Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / सावधान : डोळे आले रे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

सावधान : डोळे आले रे काळजी घ्या... डोळे येण्यापूर्वी उपाय करा सुरू! उगाच त्रासाने हाल नका करु!!

सावधान : डोळे आले रे काळजी घ्या...    डोळे येण्यापूर्वी उपाय करा सुरू! उगाच त्रासाने हाल नका करु!!

सावधान : डोळे आले रे काळजी घ्या...

 

डोळे येण्यापूर्वी उपाय करा सुरू! उगाच त्रासाने हाल नका करु!!

 

 

 

रीपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.

 

 

भद्रावती : सध्या वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) अनेक भागात डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत. सर्व वयोगटातील व्यक्ती प्रामुख्याने शाळेतील मुले या आजाराने त्रस्त आहेत.सध्या पावसाचे दिवस सुरू असून वातावरणात बराच बदल झाला आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ वाढत आहे. डोळे येणे म्हणजे काय? डोळे येणे हा एक डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये डोळ्यातून चिकट द्रव येऊन डोळे लाल होतात. है आजार संसर्गजन्य असल्यामुळे पटापट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांना स्पर्श करून तसेच त्या हाताने दुसऱ्या वस्तूंना स्पर्श केला असता आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तुला स्पर्श करून तसाच हात डोळ्यांना लावल्यास हा आजार त्या दुसऱ्या व्यक्तीला होतो. उदाहरणार्थ डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, पेन, टॉवेल चष्मा गॉगल्स ईत्यादी वस्तू वापरल्यास हा आजार झपाट्याने बळवतो.हा आजार बिलकुल गंभीर नाही. परंतु योग्य काळजी न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास तसेच औषधोपचार न घेतल्यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात व हा आजार गंभीर स्वरुपात निर्माण होते. यथायोग्य उपचार घेतल्यास हा आजार साधारणतः तीन ते सात  दिवसांमध्ये पुर्ण बरा होतो.

*लक्षणे*

(१) डोळ्यात सतत काहीतरी  गेल्याची भावना होणे. (२) डोळ्यातून पाणी व घाण येणे. (३) डोळे लाल होणे. (४) डोळ्यातून पाणी किंवा 'पस सद्दश  घाण बाहेर येऊन पापण्या चिकटतात. (५) डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतील भागांस सुज येणे. (६) डोळ्यांना खाज येणे डोळे जड वाटने (७) अंधूक दिसने तिव्र प्रकाशाचा त्रास होने.

*डोळे आलेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?*

(१) डोळा आल्याची लक्षात आल्यास सर्वप्रथम शक्य झाल्यास स्वतःला आयसोलेट करावे. (२) डोळ्यांना स्पर्श करू नये डोळे चोळु नये. (३) डोळे पुसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करावा. (४) वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार सुरू करावेत. स्वत:च्या मर्जीने मेडिकलमधील ड्रॉप सुरू करु नयेत. (५) हलका ताजा आहार घ्यावा. (६) वारंवार हात धुवत राहणे. (७) आपल्या वस्तू दुसऱ्यांना देऊ नका. (८) लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याने डोळे आलेल्या मुलांना शाळेत पाठवु नये. (९) वाटित गरम पाणी घेऊन त्यात कापसाचा बोळा भिजवून त्याने डोळ्यांच्या पापण्यांना बाहेरुन हलकासा शेक घ्यावा. (१०) प्रखर प्रकारापासून संरक्षण होण्यासाठी काळा गाॅगल वापरावा याप्रकारे योग्य काळजी घेतल्यास या डोळ्यांच्या समस्येवर मात करु शकतो.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...