युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
रुग्णवाहिकेचा वापर हा रुग्णांसाठी व अत्यावश्यक सेवेसाठी केला जातो.मात्र वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाणीतील रुग्णवाहिकेचा सर्रास दुरुपयोग केला जात असून रुग्णालय व कोळसा खाण परिसरात रुग्णवाहिका उभ्या राहत नसून मुंगोली मार्गावर तर कधी अधिकाऱ्यांच्या तर कधी एमएसएफ जवान तर कधी चक्क भाजीपाला व इतर समान आणण्यासाठी या रुग्णवाहिकेचा क्रमांक MH34.bg.8390- HR.69.E.5828 उपयोग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र रुग्णालयात रुग्णांना ने आन करण्यासाठी किंवा कोळसा खाण परिसरात एखादी अनुचित घटना घडल्यास रुग्णांना कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने नेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुंगोली कोळसा खाणीसह परिसरातील कोळसा खाणीतील कर्मचारी व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी वेकोलीतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली.मात्र याच रुग्णवाहिकेचा सर्रासपणे दुरुपयोग केला जात असून मुंगोली मार्ग व इतर ठिकानी या रुग्णवाहिका उभ्या दिसतात.तर या रुग्णवाहिकेतुन कधी एमएसएफ जवान, तर कधी भाजीपाला, व इतर खासगी काम केले जात आहेत.मात्र एखाद्याचा जीव जात असेल आणि रुग्णवाहिकेचा पत्ताच नसेल तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.याकडे मात्र वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून वेकोली अंतर्गत चालणाऱ्या रुग्णवाहिका कर्मचारी व कंत्रातदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...