आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
भद्रावती : तालुक्यातील आष्टी (काकडे) गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३१ रोज सोमवारला सकाळी उघडकीस आली. सदर वाघीण ही अंदाजे चार ते पाच वर्षाची असावी असा निष्कर्ष आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत असला तरी याबाबत अधिकृत माहिती शवाविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल.
सकाळी काही गावकऱ्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेली दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे.मागील आठवड्यात जिल्ह्यातील मुल तालुक्यातील एका शेतशिवारात वाघिणीने म्हौसींच्या कळपात झळप घालून शिकार करताच म्हौसींच्या कळपाने वाघीणीवर हल्ला चढवून वाघीणीला ठार केले होते.या आठवड्यात जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...